AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बालरोग तज्ज्ञांना ट्रेनिंग, गृहभेटींवर भर; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. (BMC's plans to tackle third wave of Covid-19)

बालरोग तज्ज्ञांना ट्रेनिंग, गृहभेटींवर भर; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
| Updated on: May 31, 2021 | 6:05 PM
Share

मुंबई: कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने बालरोग तज्ज्ञांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला असून गृहभेटींवरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC’s plans to tackle third wave of Covid-19)

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी पालिकेच्या सर्व परिमंडळ उपायुक्तांना तसे आदेश दिले आहेत. कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांद्वारे वर्तविली जात आहे. या तिसऱ्या लाटे दरम्यान लहान मुलांना व झोपडपट्टी परिसरांमधील रहिवाश्यांना संसर्गाची अधिक शक्यता असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने सुसज्ज व सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांनुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी (Field Officer) त्वरित कार्यवाही सुरू केली आहे. या प्रशिक्षण उपक्रमाच्या अंमलबजावणीस तात्काळ चालना देण्याची सूचना काकाणी यांनी केली आहे. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सर्व उपाययोजनांसह सुसज्ज झाली आहे.

अतिरिक्त आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

>> पालिकेच्या सर्व विभागस्तरीय सहायक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याच्या‌ दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे. हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करावेत. तथापि, सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन तुकड्यांमध्ये (बॅचेस) करण्यात यावे.

>> अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

>> त्याचबरोबर ‘पेडियाट्रिक टास्क फोर्स’ मधील सदस्यांनाही मार्गदर्शक म्हणून या प्रशिक्षण कार्यक्रमांना निमंत्रित करण्यात यावे.

>> या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या सर्व ‘हेल्थ पोस्ट’ च्या स्तरावर गृहभेटी वाढविण्यात याव्यात.

>> तसेच सर्व झोपडपट्टी परिसर, सार्वजनिक शौचालये आणि सार्वजनिक सुविधा इत्यादींच्या ठिकाणी अधिक प्रभावी स्वच्छता राखण्यात यावी.

>> या सर्व बाबतीत संनियंत्रण व पुनर्विलोकन हे परिमंडळ उपायुक्तांच्या स्तरावर करण्यात यावे.

>> या सर्व बाबींसंदर्भात प्रशासकीय विभागांच्या स्तरावर कृती आराखडा तयार करून तो कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावा. (BMC’s plans to tackle third wave of Covid-19)

संबंधित बातम्या:

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोरोना रुग्ण शंभरावर आल्याने नांदेडकरांना दिलासा, सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडणार

नाशिक महापालिकेचं 2759 कोटींचं बजेट सादर, निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांवर भर

(BMC’s plans to tackle third wave of Covid-19)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.