मुंबईच्या नरिमन पॉईंट इथे ढगाळ वातावरणाची निर्मिती…गार वारा सुटल्याने मुंबईकर सुखावले…

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊसाचे वातावरण तयार होत आहे. दरम्यान मुंबईतही सध्या ढगाळ वातावरण बनत असून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. तर मुंबईकरांनाही पावसाचे वेध लागले आहेत. दरम्यान पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांसह पर्यटकही मुंबईतील अनेक बीच जमत आहेत. तर मरिन लाईनवर सध्या अनेक पर्यटक जमलेले आहेत.

मुंबईच्या नरिमन पॉईंट इथे ढगाळ वातावरणाची निर्मिती…गार वारा सुटल्याने मुंबईकर सुखावले…
पाऊस
Image Credit source: tv9
| Updated on: May 25, 2022 | 11:17 AM

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुर्व पासवाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांआधी राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटींग केल्याने उन्हाच्या झळा झेलणाऱ्या नागरिकांना थोडा आराम मिळाला होता. तर पाऊसला सुरूवात होत असल्याने शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. त्यातच मुंबई आणि नवी मुंबई भागात ही पाऊस (Rain) पडल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता. आता मुंबईच्या नरिमन पॉईंट (Nariman Point) इथे ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून गार वारा सुटला आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत. तसेच हवामानशास्त्र विभागाने कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. जेणेकरून सामान्यांसह बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.

पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

हवामानशास्त्र विभागाने कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर विभागाने कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इथे पुढील तीन दिवस पावस पडण्याची शक्यता ही वर्तवली आहे.

मुंबईकर सुखावले

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊसाचे वातावरण तयार होत आहे. दरम्यान मुंबईतही सध्या ढगाळ वातावरण बनत असून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. तर मुंबईकरांनाही पावसाचे वेध लागले आहेत. दरम्यान पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांसह पर्यटकही मुंबईतील अनेक बीच कर जमत आहेत. तर मरिन लाईनवर सध्या अनेक पर्यटक जमलेले आहेत.

राजस्थानमध्ये वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ

तर आज पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेशात पावसाचा वेग कमी होईल आणि उद्यापासून 25 मे 2022 रोजी घट होईल असेही हवामान खात्याने सांगितलं आहे. तसेच पश्चिम राजस्थानमध्ये वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आले आहे.