Thackeray Brothers : कालच्या आंदोलनात हिरो ठरलेल्या दोन्ही ज्यूनियर ठाकरे बंधुंना पोलिसांनी दिला दणका

Thackeray Brothers : सध्या देशात आंदोलनांचं सत्र सुरु आहे. दिल्लीच्या धर्तीवर काल मुंबईतही जोरदार आंदोलन झालं. ज्यूनियर ठाकरे बंधुंनी दादर शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.

Thackeray Brothers : कालच्या आंदोलनात हिरो ठरलेल्या दोन्ही ज्यूनियर ठाकरे बंधुंना पोलिसांनी दिला दणका
Thackeray Brothers
| Updated on: Oct 12, 2026 | 9:14 AM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल दादर शिवाजी पार्क परिसरात आंदोलन झालं. दोन्ही ज्यूनियर ठाकरे बंधु या आंदोलनात उतरले होते. यावेळी पोलिसांसोबत आंदोलकांची झटापट, बाचाबाची झाली. पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना उचलून पोलीस ठाण्यात नेल. या आंदोलकांच्या सुटकेच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाचे आणि मनसेचे नेते आक्रमक झाले होते. शिवाजी पार्क पोलीस स्टेशन बाहेर सीजेपीसह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमले होते. आंदोलकांची सुटका करावी, यासाठी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर वाढता दबाव लक्षात घेऊन शिवाजीपार्क पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका केली.

पण आता मात्र दादर शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल 300 आंदोलकांना यावेळी ताब्यात घेण्यात आलं होतं. सेना भवन परिसरात आदित्य ठाकरेंनी ठिय्या दिला होता. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात देखील आंदोलकांच्या सुटकेसाठी आदित्य, अमित मैदानात उतरले होते. मात्र आज शिवाजीपार्क पोलिसांकडून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार अशी सूत्रांची माहिती आहे.

Loading...

गाडीच्या छतावर चढून उपस्थितांना अभिवादन

कालच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे आदित्य ठाकरेंसोबत त्यांचे बंधु तेजस ठाकरे सुद्धा मैदानात उतरले होते. तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय नाहीत. पण ते काल पहिल्यांदाच दिसले.पोलीस स्टेशन बाहेर आल्यावर अमित आणि आदित्य दोन्ही ठाकरे बंधुंनी गाडीच्या छतावर चढून उपस्थितांना अभिवादन केलं होतं. आज पुन्हा एकदा दादर शिवाजी पार्क परिसरात मोठं आंदोलन होणार आहे. मनसेकडून सह्याची मोहिम राबवण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी आजच्या आंदोलनाआधी सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर मनसेच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.

जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना सलाम

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा हा विरोधकांचा एकमेव उद्देश आहे. SIR प्रक्रियेत परस्पर बदल केले. त्यामुळे कोट्यवधी मतदार डिलिट झाले. म्हणून ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या ही मागणी आहे. “जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना आम्ही सलाम करतो. उद्याचे आंदोलन कुठे असेल हे लवकरच सांगू. सर्वांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची राहिल” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us