
सांगली : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पशूपालन व्यवसायासाठी अनुदानित केलेले शेळी, मेंढी म्हैस यांच्या खरेदसीठीचे कर्ज हे जुन्या दराप्रमाणे दिले जात आहे. हे कर्ज नव्या दराप्रमाणे देण्यात यावे यासाठी सांगलीत जिल्हा परिषदेसमोर ( Sangli Zilla Parishad) दलित महासंघाने (Dalit Federation) कोंबडा मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी हातात कोंबड्या घेत तसेच कोंबड्यांची वेषभूषा करत आंदोलन केले. (Dalit Federation protested in front of Sangli Zilla Parishad)
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशूपालन व्यवसायासाठी अनुदानित कर्ज दिले जाते. कर्ज हे या व्यवसायाच्या जुण्या दराप्रमाणे दिले जात आहे. त्यामुळे नवे कर्ज हे नव्या दराप्रमाणे द्यावे अशी मागणी येथील मागरिकांनी केली. तसेच देण्यात येणारे अनुदान हे तत्काळ महागाईप्रमाणे वाढवून देण्यात यावे, असेही या आंदोलकांची मागणी आहे. तसेच 15 – 02 – 2021 ची तारखेची असलेली मुतद वाढवून द्यावी अशीसुद्धा मागणी दलित महासंघाने केली.
दलित महासंघचे उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, या प्रकरणी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला टाळे ठोकण्याचा असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
निलेश राणेंनी राऊतांना धमकी दिल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांकडे कारवाईची मागणी#nileshrane #vinayakraut #satishsawanthttps://t.co/cJIpNTow1K
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2021
संबंधित बातम्या :
(Dalit Federation protested in front of Sangli Zilla Parishad)