AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आघाडी सरकारला शॉक देणार, राज्यात लवकरच वीज दरवाढीविरोधात प्रचंड आंदोलन; चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

आम्ही सरकारला शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू देणार नाही. शेतकऱ्यांचं वीज तोडणाऱ्या सरकार विरोधात लवकरच राज्यव्यापी प्रचंड आंदोलन उभारण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (we will protest in all over maharashtra against inflated power bill says chandrashekhar bawankule)

भाजप आघाडी सरकारला शॉक देणार, राज्यात लवकरच वीज दरवाढीविरोधात प्रचंड आंदोलन; चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा
| Updated on: Feb 12, 2021 | 12:50 PM
Share

नागपूर: कोरोना काळात राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही. आता त्यांना भरमसाठ वीज बिल पाठवून वीज तोडण्याच्या नोटीसाही बाजवल्या आहेत. ही अत्यंत संतापजनक बाब असून आम्ही सरकारला शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू देणार नाही. शेतकऱ्यांचं वीज तोडणाऱ्या सरकार विरोधात लवकरच राज्यव्यापी प्रचंड आंदोलन उभारण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (we will protest in all over maharashtra against inflated power bill says chandrashekhar bawankule)

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन तोडण्यासाठी नोटीसा बाजवल्या आहेत. शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. सोयाबीनचा हंगाम आला आहे. अशा वेळी वीज तोडल्यास शेतकऱ्यांचं हातातलं पीक निघून जाईल आणि शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरणार नाही. शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन अवेळी कट करणे योग्य नाही, असं सांगतानाच सरकारच्या या अरेरावी विरोधात आम्ही जोरदार आंदोलन करणार आहोत, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

सरकारविरोधात संघर्ष करा

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सरकारविरोधात संघर्ष करण्याचं आवाहन केलं. तसेच तुमचं वीज कनेक्शन कोणी तोडायला आले तर आम्हाला कळवा. आमचे कार्यकर्ते तुमच्या मदतीला धावून येतील, असं सांगतानाच शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कोणी तोडायला आल्यास तिथे धावून जा, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. राज्य सरकारने वीज कंपन्यांनाना दहा हजार कोटी रुपयांचं अनुदान देण्याच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

दहा हजार कोटींचं अनुदान द्या

वीज कंपन्याना दहा हजार कोटींचं अनुदान देऊन शेतकऱ्यांची वीज बिल माफ करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी आठ पत्रं लिहिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी माझ्या एकाही पत्राला उत्तर दिलेलं नाही, असंही ते म्हणाले. नागपूरची 778 कोटींची डीपीसी 500 कोटींवर आलीय. तो निधीही मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. उपराजधानी असलेल्या नागपूरचे पैसेही राज्यातील विदर्भातील मंत्री आणू शकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. ठाकरे सरकारमधील तीन पक्षांमध्ये तिन्ही समन्वय नाही. त्यामुळे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत अडचणीत सापडले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

पेट्रोल-डिझेल राज्यसरकारने वाढवले

यावेळी बावनकुळे यांनी राज्य सरकारनेच पेट्रोल-डिझेलचे दर वाढवल्याचा दर वाढवल्याचा दावा केला. राज्य सरकारने टॅक्स वाढवल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. राज्य सरकारने 38 रुपये कर कमी केल्यास पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील. त्यामुळे हे भाव कमी करावे, अशी मागणीही त्यांनी केली. (we will protest in all over maharashtra against inflated power bill says chandrashekhar bawankule)

संबंधित बातम्या:

मिटकरी बाजारू विचारवंत, पडळकर पिसाळलेली वृत्ती; मिटकरी-पडळकर जुंपली

सरकार बॅकफूटवर, शिवजयंतीसाठी नवी नियमावली; 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच त्यांनी ठरवलंय?, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा

(we will protest in all over maharashtra against inflated power bill says chandrashekhar bawankule)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.