मिटकरी बाजारू विचारवंत, पडळकर पिसाळलेली वृत्ती; मिटकरी-पडळकर जुंपली

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. (gopichand padalkar slams amol mitkari over Ahilyabai holkar statue)

मिटकरी बाजारू विचारवंत, पडळकर पिसाळलेली वृत्ती; मिटकरी-पडळकर जुंपली


मुंबई: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पडळकर यांनी मिटकरींवर बाजारू विचारवंत असल्याची टीका केली तर मिटकरी यांनी पडळकरांना पिसाळलेली वृत्ती म्हणून हल्ला चढवला. (gopichand padalkar slams amol mitkari over Ahilyabai holkar statue)

अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण रखडले होते. गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यावरून पडळकर आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली. दोन्ही नेत्यांनी आक्रमक होत एकमेकांना अरे तुरे करत एकमेकांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांची टीव्ही9 मराठीने प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. दोघांहीनी अरेतुरेच्या भाषेत एकमेकांवर लाखोली वाहिली.

पडळकर काय म्हणाले?

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अमोल मिटकरी यांचा बाजारू विचारवंत असा उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसही होळकर घराण्याच्या विरोधात असून होळकर घराण्याचा इतिहास पुसून टाकण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास जाणूनबुजून वेळ लावल्याचा आरोपही त्यांनी केला. मिटकरी सारख्या बाजारू विचारवंतांनी आम्हाला सल्ले देऊ नये, आम्ही राष्ट्रवादीचं षडयंत्र उद्ध्वस्त करू, असा इशारा पडळकरांनी दिला. तर, बारामतीत पडलेल्या उमदेवारांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असा टोला मिटकरी यांनी लगावताच पडळकरांनी पलटवार केला. पवारांच्या छाताडावर बसून निवडणूक लढवली, असा दावा पडळकरांनी केला. पवारांनी पुतळ्याचं अनावरण करण्यास चालढकल केल्यानेच आम्हाला पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.

मिटकरी काय म्हणाले?

यावेळी अमोल मिटकरी यांनीही पडळकरांना प्रत्युत्तर दिलं. पडळकर म्हणेज बिरोबाची शपथ घेऊन समाजाला विकणारा नेता आहे, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांचा समाचार घेतला. पडळकरांना कावीळ झाल्याने त्यांना सर्वत्र पिवळं दिसत आहे. पडळकर हे पिसाळलेल्या प्रवृत्तीचे असून ते भाजपला बुडवल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. पडळकरांनी चोरासारखं पुतळ्याचं अनावरण केलं. आम्हीच होळकरांचे वारसदार असून पडळकर हे आधुनिक शिशूपाल आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी पडळकरांना भाषा नीट वापरण्यासाठी दमबाजीही केली. महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे पडळकर आहेत. महाभारतात शिशूपाल जसा चुका करत होता. तशाच चुका पडळकर करत आहेत. आपणच किती शहाणे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शरद पवार उद्या पुतळ्याचं अनावरण करणार होते. पण पडळकरांनी चोरून उद्घाटन केलं, असंही त्यांनी सांगितलं. (gopichand padalkar slams amol mitkari over Ahilyabai holkar statue)

संबंधित बातम्या:

अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं अनावरण भोवलं, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब; पडळकरांचा घणाघात

‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’, पडळकरांचं राऊतांना पत्र

(gopichand padalkar slams amol mitkari over Ahilyabai holkar statue)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI