नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा फटका, द्राक्ष, कांदा, हरभरा, गहू पिकांचे मोठे नुकसान

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा फटका, द्राक्ष, कांदा, हरभरा, गहू पिकांचे मोठे नुकसान (Damage to agriculture, orchards, vegetables due to untimely rains)

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा फटका, द्राक्ष, कांदा, हरभरा, गहू पिकांचे मोठे नुकसान
लासलगाव, निफाड, पिंपळगावमध्ये पिकांचे नुकसान
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 2:28 PM

लासलगाव : गेले दोन दिवस राज्याला अवकाळी पावसाने झोडपले असून गारपिटीसह आलेल्या पावसाने बळीराजाच्या तोंडचा घास पळवला आहे. कोकणापासून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सर्वत्र पावसाने झोडपले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदा, हरभरा व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. (Damage to agriculture, orchards, vegetables due to untimely rains)

लासलगाव, निफाड, पिंपळगावमध्ये पिकांचे नुकसान

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. मात्र बुधवारी संध्याकाळी राज्यात सर्वत्र अचानक वादळी वाऱ्यासह कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. नाशिकमधील ओझर, निफाड आणि पिंपळगाव बसवंत या भागात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. लासलगाव, विंचूरसह परिसरात तुरळक पाऊस झाला असला तरी वादळ मोठ्या प्रमाणात असल्याने द्राक्ष आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाचा फटका कांद्यालाही बसला आहे. सध्या कांद्याला तीन ते चार हजार रुपये इतका बाजार भाव असताना आता या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कांद्याच्या पिकाचे नुकसान होत बाजार भाव घसरण्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहे.

गेल्या महिन्यातही पावसामुळे मोठे नुकसान

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातीह अवकाळी पावसाने राज्यातील काही भागाला झोडपले होते. अवकाळी पावसामुळे द्राक्षे, हरभरा, गहू, टॉमेटोसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. सिन्नर, चांदवडमध्ये कांद्याचे मोठ्ाय प्रमाणात नुकसान झाले होते. निफाड, सिन्नर तालुक्यात एक तासाहून अधिक काळ पडलेल्या पावसामुळे कांदा, मका पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात दाणादाण उडाली होती. खेडलेझुंगेत परिसरात दीड ताासहून अधिक वेळ पडलेल्या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागेत पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. चांदवड तालुक्यात सलग दोन तास पडलेल्या पावसामुळे काढलेला कांदा शेतातच भिजला होता. याशिवाय नांदगाव, देवळ्यातही पावसाचा फटका बसला होता. (Damage to agriculture, orchards, vegetables due to untimely rains)

इतर बातम्या

VIDEO | आता अवकाळीचे संकट, बळीराजाच्या पाठी लागलेले शुक्लकाष्ट संपता संपेना !

… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.