Darmaveer : धर्मवीर सिनेमामुळे ग्रामीण भागात शिवसेना वाढणार, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना विश्वास

| Updated on: May 17, 2022 | 8:24 PM

आनंद दिघे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशातून हा सिनेमा दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहोचेल आणि ग्रामीण भागातही सेनेचे बळकटीकरण होईल, असा विश्वास माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

Darmaveer : धर्मवीर सिनेमामुळे ग्रामीण भागात शिवसेना वाढणार, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना विश्वास
शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणेंनी कार्यकर्त्यांना धर्मवीर सिनेमा दाखवला
Image Credit source: TV9
Follow us on

जळगाव : राज्यात शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यावर आधारित ‘धर्मवीर’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हा चित्रपट पाहिला. धर्मवीर (Dharmaveer) सिनेमाला शहरासोबतच ग्रामीण भागातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. धर्मवीर पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जळगावातील चोपडा शहरात सोमवारी शिवसेनेच्या वतीने नागरिकांना धर्मवीर सिनेमा मोफत दाखविण्यात आला. आनंद दिघे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशातून हा सिनेमा दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहोचेल आणि ग्रामीण भागातही सेनेचे बळकटीकरण होईल, असा विश्वास माजी आमदार चंद्रकांत सोनवणे (Chandrakant Sonavane) यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या चोपडा मतदार संघाचे आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, सागर ओतारी, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून हा चित्रपट पाहिला. प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेचआनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सिनेमागृहात चित्रपटाला सुरुवात झाली. चित्रपट पाहण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरेंनीही पाहिला ‘धर्मवीर’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 मे रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि प्रसाद ओकसोबत नरीमन पॉईंट इथल्या आयनॉक्स चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अभिनेता प्रसाद ओकच्या भूमिकेचं तोंडभरून कौतुक केलं. धर्मवीर चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, दुसऱ्यांच्या जीवनात आनंद भरणारे आमचे आनंद दिघे प्रसाद ओकेने पुन्हा जिवंत केले. अप्रतिम भूमिका केली आहे. आनंदजींच्या ज्या लकबी होत्या त्या त्याने उत्तमरित्या साकारल्या आहेत. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. सर्वांनी हा चित्रपट पाहावा. आयुष्य कसं जगावं हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहा. शिवसैनिक कसा असावा, निष्ठा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? हे या चित्रपटातून कळतं. शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघेंचं नातं काय हे या चित्रपटातून पाहायला मिळतं. असे शिवसैनिक मला लाभले, एकनाथ शिंदे, राजन आहे, हे सगळे आनंद दिघे यांच्या मुशीतून तयार झाले आहेत. गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे चित्रपटातून दिसतं.

हे सुद्धा वाचा