Dharmaveer: ‘धर्मवीर’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये

पहिल्याच दिवशी चारशेहून अधिक थिएटर्समध्ये 'धर्मवीर'चे (Dharmaveer) 10 हजारांहून अधिक शोज लावले गेले. ठाण्यात तर काही थिएटर्सबाहेरील त्यांच्या कटआऊटला दुग्धाभिषेक केला तर काही ठिकाणी प्रेक्षक बँड बाजा घेऊन वाजत, गाजत, नाचत पोहोचले.

Dharmaveer: 'धर्मवीर'ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
DharmaveerImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 11:41 AM

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकच्या (Prasad Oak) करिअरमधील सुवर्णकाळ सध्या सुरू आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एकीकडे त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता त्याची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करतोय. प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चारशेहून अधिक थिएटर्समध्ये ‘धर्मवीर’चे 10 हजारांहून अधिक शोज लावले गेले. ठाण्यात तर काही थिएटर्सबाहेरील त्यांच्या कटआऊटला दुग्धाभिषेक केला तर काही ठिकाणी प्रेक्षक बँड बाजा घेऊन वाजत, गाजत, नाचत पोहोचले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.05 कोटी रुपयांचा गल्ला (box office collection) जमवला. तर गेल्या तीन दिवसांत ‘धर्मवीर’ने 9.59 कोटी रुपये कमावल्याचं कळतंय. महाराष्ट्रात अजूनही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल गर्दी जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.

वीकेंडलाही ‘धर्मवीर’ची चांगली कमाई झाली. रविवारी या चित्रपटाने 3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली, तर अभिनेता क्षितिज दाते हा एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत आहे. रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी या कलाकारांच्या लूकवर विशेष मेहनत घेतली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

या चित्रपटाचा पहिला पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचं प्रमोशनही अगदी जोरदार करण्यात आलं. प्रमोशन आणि माऊथ पब्लिसिटीचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होताना दिसतोय.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.