शेतकऱ्यांनो काळजी घ्या, संकट आणखी तीव्र होणार, एल निनोवर कृषिमंत्री भरणे महत्वाचे बोलले

शेतकऱ्यांवरील संकट आणखी तीव्र होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना सरकार मदत करण्यास सज्ज आहे. शेतकऱ्यांनी वेगळा विचार करू नये, सरकार तुमच्यासोबत आहे, असा संदेश भरणेंनी शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांनो काळजी घ्या, संकट आणखी तीव्र होणार, एल निनोवर कृषिमंत्री भरणे महत्वाचे बोलले
el nino news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 1:54 PM

एल निनोमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. खरीपाची पिके जळून गेली आहेत. आता शेतकऱ्यांचं लक्ष परतीच्या पावसाकडे लागलं आहे. परतीचा पाऊस बरसला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. पण परतीचा पावसानेही दांडी मारल्यास शेतकऱ्यांचं संकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात संकट निर्माण करणाऱ्या एल निनोवर कृषिमंत्री भरणे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री भरणे म्हणाले, ‘ आपण हवामान विभागावर अवलंबून असतो. शेवटी ते तज्ज्ञ असतात. ते देखील अंदाजावर माहिती देत असतात. कधी कधी त्यांचे अंदाज चुकतात. कधी खरे ठरतात. एल निनोचं संकट आहेच. पावसाळ्यात आता ऊन पडलं आहे. त्यामुळे दुष्काळ पडला आहे. उन्हाळ्यात आणखी कडक ऊन पडेल, असाही त्यांचा अंदाज आहे. अजूनही परतीचा पाऊस आहे. परतीचा पाऊस पडावा, अशी ईश्वराला साकडं आहे. आमचा शेतकरी अडचणीत आहे. खरीप वाया गेलं आहे. पाऊस पडला तर रब्बीत काही हाती लागेल’.

Loading...

शेतकऱ्यांना आवाहन करताना भरणे म्हणाले,’ हे संकट आहे. निश्चितपणे पावसामध्ये खंड पडला आहे. पिके जळाली आहेत. हे निसर्गाचे संकट आहे. या संकटाला सामोरे जावे लागेल. या संकटाचा सामना करावा लागेल. अडचणीचा काळ आहे. अडचणीच्या काळात सरकार तुमच्याबरोबर आहे. आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू. या बाबतीत निश्चितपणे गावात जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊ. शासनाच्या वतीने नागरिक आणि शेतकऱ्यांच्या रोजगाराच्या समस्या असतील. शेती, पशुधनाच्या बाबतीत असेल. जिथ जिथ शेतकऱ्यांना आवाहन करू की, वेगळा विचार न करता सरकार तुमच्याबरोबर आहे. हा सर्व अडचणीचा काळ आहे. यात डगमगता कामा नये’.

शेतकऱ्यांच्या वावरातील पंचनामे कसे करणार, यावर भरणे म्हणाले, ‘एनडीआरएफची मदत घेणार आहे. यासाठी नियमांचं पालन करावं लागतं. केंद्र सरकारची मदत घेत आहे. त्यानंतरही त्यांच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करेल’. परंतु पंचनाम्याआधी आर्थिक मदतीची मागणी शेतकरी करत आहे, त्यावर भरणे म्हणाले, ‘शेवटी प्रक्रिया पूर्ण करू द्या. शनिवारी अधिसूचना काढली आहे. आज सोमवार आहे. लवकरात लवकर करू. आम्ही देखील शेतकरी आहोत. आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत. शेतकऱ्यांचं दु:ख अडचणी ठाऊक आहेत. आम्हाला झोपताना शेती दिसते. आम्हाला सकाळी उठताना शेती दिसते. त्यामुळे लवकरात लवकर मदत करू’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us