नितीन गडकरींचं ‘ते’ स्वप्न पूर्ण होणार? नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी म्हणतात…

नाग नदी स्वच्छता करून त्यातून स्वच्छ पाणी वाहवं हे स्वप्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आहे. यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले,असं नागपूरचे महापौर म्हणाले. Dayashankar Tiwari Nitin Gadkari

नितीन गडकरींचं 'ते' स्वप्न पूर्ण होणार? नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी म्हणतात...
दयाशंकर तिवारी, नितीन गडकरी

नागपूर: नागपूरच्या नाग नदीला साबरमती नदीच्या धर्तीवर स्वच्छ करण्यात येणार आहे. नाग नदी स्वच्छ करण्यासाठी आयआयटी रुडकी कडून प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. नाग नदी स्वच्छता करून त्यातून स्वच्छ पाणी वाहवं हे स्वप्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आहे. यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. आता, मात्र त्याची पूर्तता होण्याची शक्यता आहे, असं दयाशंकर तिवारी म्हणाले. (Dayashankar Tiwari said Nitin Gadakri dream will came in reality to restoration Nag River)

नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प 2 हजार 200 कोटी चा प्रोजेक्ट असून यासाठी जपानची कंपनी फायनान्स करत आहे. 15 टक्के महापालिका , 25 टक्के राज्य सरकार यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे. नाग नदी वरुनच नागपूर हे नाव शहराला प्राप्त झालं आहे, एका काळात स्वच्छ निर्मल असलेली नाग नदी सध्या नाला म्हणून ओळखला जातो, अशी खंत दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली.

नागनदीला पूर्ववैभव मिळवून देण्याचा प्रयत्न

नागपूर शहराच्या मधोमध वाहणारी नाग नदी स्वच्छ करून पुन्हा तिला जूनं वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. या आधी देखील नाग नदी स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत बैठक झाली. नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील प्रकल्पा पैकी एक प्रकल्प आहे. नाग नदी स्वच्छता प्रकल्प असल्याने लवकरच नागनदी मधून जलतरण देखील करता येणार आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

नागपूरच्या नाग नदीचं पुनरुज्जीवन

नागपूरच्या पुरातन नाग नदीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हा प्रकल्प एकूण 1700 कोटी रुपयांचा आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंजुरीही मिळाली होती. मात्र, कोरोनामुळे हे काम थांबलं होतं. कोरोनामुळे आर्थिक संकट उभं राहिल्याने सरकारने कोणताही नवा प्रकल्प हाती न घेण्याचं ठरवलं होतं. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांशी बोलून हा प्रकल्प सुरू करण्याची परवानगी मिळवली आहे. त्यामुळे आता सल्लागार वगैरे नेमून टेंडर प्रक्रिया सुरू करू, त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं.

नागपूरचं वैभव असलेली नाग नदी आता डबकं झालीय. मात्र, तिला गतवैभव मिळवून देण्याचे प्रयत्न होत असले तरी ते पूर्ण होतील का हे आता वेळच ठरवेल.

संबंधित बातम्या: 

गोसीखुर्दचा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार? हा आहे गडकरी मार्ग

Video: नागपूरचा नाग आणि पुण्याच्या मुळा मुठा प्रकल्पाचं काय होणार? ऐका खुद्द गडकरी काय सांगतात

(Dayashankar Tiwari said Nitin Gadakri dream will came in reality to restoration Nag River)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI