मोठी बातमी! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला, बंद दालनाआड काय चर्चा?

Eknath Shinde Meets Sharad Pawar : आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला, बंद दालनाआड काय चर्चा?
Eknath Sinde meets Sharad Pawar Photo
Image Credit source: Google
| Updated on: Jul 08, 2026 | 6:03 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे राज्यातील जवळपास सर्व बडे नेते आणि आमदार सध्या मुंबईत आहेत. अशातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विधान भवन परिसरात नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला

आज कॅबिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेटची बैठक सोडून शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते. काही वेळ चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे हे पुन्हा बैठकीसाठी निघून गेले. दरम्यान, या भेटीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदारांची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात बोलावली आहे. या बैठकीआधी एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर, रोहित पाटील, अभिजीत पाटील हे बैठकीला हजर आहेत. या बैठकीत शरद पवार आमदारांना महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला होता. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. पक्षांतराच्या या घटनांनंतर आता शरद पवार यांचा पक्ष एनडीएला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांची भेटही झाल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीकडून एनडीएत सामील होण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीत.

Follow Us