सरकार दरबारी ते मृत ठरले,पाटणच्या जाधव यांचे न्यायासाठी ११ महिने मुंबईला खेटे..

जीवंत असतानाही कागदोपत्री मृत दिसत असल्यामुळे आपले जगणे कागदोपत्री नसल्यासारखे झाले असल्याने आपली मन:स्थिती बिघडल्याचे रवींद्र जाधव यांनी म्हटले आहे.

सरकार दरबारी ते मृत ठरले,पाटणच्या जाधव यांचे न्यायासाठी ११ महिने मुंबईला खेटे..
Ravindra Jadhav
| Updated on: Jun 25, 2026 | 11:15 PM

पेन्शनरकडून ते स्वत:समोर जीवंत दिसत असूनही दर काही महिन्यांनी बँकेत ते जीवंत असल्याचा कागदोपत्र पुरावा मागितला जात असतो. तसाच काहीसा प्रकार आता सातारा-पाटण येथील रवींद्र जाधव यांच्या बाबत घडला आहे. येथे मात्र उलट झाले आहे. त्यांना सरकारी दरबारी मृत ठरवण्यात आले आहे.त्यामुळे त्यांना आता आपण जीवंत आहोत हे सांगत सातारा ते मुंबई गेली ११ महिने खेटरं झिजवावी लागत आहेत.

एखाद्या व्यक्तीला जीवंत असतानाही तो मृत घोषीत केल्याचा प्रकार कधी तुम्ही ऐकला आहे का ? पाटण गिरेवाडी येथील रवींद्र जाधव यांचे अस्तित्व प्रशासनाने हिरावले आहे. त्यांच्या आधारकार्डला डी-एक्टीव्हेट केल्याने विना आधार त्यांना सरकारच्या कोणत्याच योजनांचा लाभ आणि बँकेचे व्यवहार पूर्ण करता येत नसल्याने त्यांचे जगणे कठीण झाले आहे. जाधव यांची गेले ११ महिने यासाठी शासन दरबारी न्यायासाठी फरफट सुरु आहे.

जिवंत असूनही प्रशासनाने अस्तित्व हरावले

आधार कार्ड बंद झाल्याने पाटण गिरेवाडी येथील रवींद्र जाधव जिवंत असतानाही कागदोपत्री मृत दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधार कार्ड डी- ऍक्टिव्हेट झाल्याने सातारा पाटण गिरेवाडी येथील रवींद्र जाधव यांची फरफट सुरू आहे. न्यायासाठी मुंबईपर्यंत कार्यालयाचे उंबरठ्याची झिजवुन ही ११ महिन्यापासून रविंद्र जाधव कागदोपत्री मृत दिसत आहेत. आधार विना बँकेसह सर्व आर्थिक शासकीय व्यवहार ठप्प झाल्याने रविंद्र जाधव यांची मानसिक स्थिती बिघडली आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण गिरेवाडी येथील रवींद्र आत्माराम जाधव यांना प्रशासनाच्या त्रुटीमुळे जिवंत असताना ही मृत घोषित करण्यात आल्याने त्यांचे आधार कार्ड ऑगस्ट 2025 पासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे त्यांचे बँक व्यवहार, रेशन कार्ड, पासपोर्ट, अनेक ठिकाणच्या केवायसी इतर शासकीय आणि खाजगी कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत.

आधार कार्ड सुरूच झाले नाही..

रवींद्र जाधव यांनी आधार कार्ड सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी मुंबईतील कुलाबा येथे असणाऱ्या मुख्य आधार केंद्रात दोन वेळा जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला मात्र नेमके आधार कोणत्या नोंदीमुळे डी- ऍक्टिव्हेट झाले. याबाबत काहीही सांगितलं जात नाही. आधार कार्ड सुरू होईल प्रक्रियेस वेळ लागेल असं सांगितले जात आहे. मात्र, आज आजतागायत त्यांचे आधार कार्ड सुरू झालेले नाही त्यामुळे मुला मुलांची शैक्षणिक कामे , दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. प्रशासनाच्या चुकीचा फटका एका जिवंत व्यक्तीला बसत असल्याने त्यांनी शासनाकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Follow Us