आमचे हिंदुहृदय सम्राट एकच! नितेश राणेंचं फडणवीसांविषयीचं वक्तव्य केसरकरांना अमान्य

आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. कडवट हिंदुत्ववादी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हिंदुहृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवावं..., असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता.

आमचे हिंदुहृदय सम्राट एकच! नितेश राणेंचं फडणवीसांविषयीचं वक्तव्य केसरकरांना अमान्य
दीपक केसरकर, शिक्षणमंत्री
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 2:56 PM

मुंबईः एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गट आणि भाजपात युती झाल्यानंतर कोकणातील केसरकर (Deepak Kesarkar) विरोधात राणे हा वाद काही प्रमाणात शमल्याचं दिसतंय. किंबहुना आगामी निवडणुकांसाठी तरी दोन्ही बाजूंचे शाब्दिक वार कमी झालेत. पण शिवसैनिकांची कट्टरता वेळ पडेल तिथे दिसून येते. दीपक केसरकर यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं. काही दिवसांपूर्वी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदय सम्राट असं संबोधलं होतं. यावर दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं. हिंदुहृदयसम्राट फक्त एकच आहेत. ते कुणीही बदलण्याचा प्रयत्न करू नयेत..

काय म्हणाले केसरकर?

महाराष्ट्राच्या दृष्टीने हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच आहेत. ते त्यांना जनतेनं दिलेलं पद आहे. ते पद त्यांच्यासाठी योग्य आहे. त्यांची ओळखच तशी आहे. त्यांची शिवसेना ही आमची शिवसेना आहे. त्यांची हिंदुत्वाची संकल्पना वेगळी होती. हिंदुस्थानवर प्रेम करणारा प्रत्येक जण हिंदु ते मानत असतं, असं दीपक केसरकर यांनी ठणकावून सांगितलं.

हिंदुत्ववादी कोण, यावरून भाजप, शिवसेना आणि शिंदेगट यांच्यात स्पर्धा लागल्याचंच एकूण चित्र आहे.

11 सप्टेंबर रोजी नितेश राणे यांनी अहमदनगर येथे एक वक्तव्य केलं. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना हिंदुहृदयसम्राट असं संबोधलं.

आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. कडवट हिंदुत्ववादी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हिंदुहृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवावं…

म्हणून कुठलाही अधिकारी हिंदु मुलाकडे वाकड्या नजरेनं पाहिल तर त्याचे डोळे जागेवर राहणार नाही, हा इशारा समजून घ्या, असं वक्तव्य अहमदनगर येथील श्रीरामपूरच्या सभेत नितेश राणे यांनी केलं होतं.