डोनाल्ड ट्रम्प यांची तडकाफडकी मोठी घोषणा, भारताला बसणार जबर फटका, अमेरिकेतून मोठी बातमी
भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे, ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे भारताला फटका बसण्याची शक्यात आहे. अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे कायम चर्चेमध्ये असतात, ट्रम्प यांच्याकडून सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. मात्र तरी देखील भारताची रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच आहे. नोव्हेंबर महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेतमध्ये भारतानं रशियाकडून सर्वाधिक तेलाची खरेदी केली आहे. मात्र हे सर्व सुरू असतानाच ट्रम्प यांच्या काही निर्णयामुळे भारताला फटका बसत असल्याचं देखील समोर आलं आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर त्यांनी अचानक एच1बी व्हिसाच्या नियमांमध्ये बदल केला, त्याच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली. याचा थेट फटका भारताला बसला, दरम्यान त्यानंतर त्यांनी एच1बी व्हिसाच्या मुलाखती देखील लांबणीवर टाकल्या, आता ऑक्टोबर 2026 मध्ये या व्हिसासाठी मुलाखती सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक ग्रीन कार्ड लॉटरी प्रोगाम सस्पेंड केला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं गुरुवारी या निर्णयाबद्दल महिती देण्यात आली आहे. नुकतीच अमेरिकेच्या ब्राउन विद्यापीठात आणि एमआयटी विद्यापीठामध्ये गोळीबाराची घटना घडली होती, त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. ज्या आरोपीने हा गोळीबार केला होता, तो आरोपी अमेरिकेच्या ग्रीन कार्ड प्रोगामचा लाभार्थी होता, असा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे, त्यानंतर त्यांनी आता ग्रीन कार्ड लॉटरी प्रोगाम तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या आदेशानं हा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. याचा मोठा फटका आता हा भारताला बसण्याची शक्यता आहे.
ग्रीन कार्ड लॉटरी प्रोगाम अंतर्गत दरवर्षी 50,000 परदेशी नागरिकांना अमेरिकेकडून ग्रीन कार्ड व्हिसा दिला जातो. लॉटरी पद्धतीने याची निवड होते. भारतीय लोकांची अमेरिकेत संख्या जास्त आहे, आता अमेरिकेनं ही योजना बंद केल्यामुळे सर्वाधिक भारतीय लोकच प्रभावीत होण्याची शक्यता आहे.
