Gram Panchayat : भाजपच्या बड्या नेत्यानं ‘राज्य’ जिंकून दाखवलं पण…मुलीच्या पॅनलचा दारुण पराभव

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्राम पंचायत निवडणुकीत सी आर पाटील यांच्या कन्येचा पॅनल निवडणूक रिंगणात होता.

Gram Panchayat : भाजपच्या बड्या नेत्यानं राज्य जिंकून दाखवलं पण...मुलीच्या पॅनलचा दारुण पराभव
Image Credit source: Google
| Updated on: Dec 20, 2022 | 11:43 AM

जळगाव : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणूक यशस्वी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा परभव झालेला आहे. राज्य जिंकून दाखवणाऱ्या सी आर पाटील यांना एकप्रकारे गावातच पराभव स्वीकारावा लागला आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र त्यांच्या ग्राम विकास पॅनलचा पराभव स्वीकारावा लागला आहे. भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या आहेत. तर भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या आहेत. त्यात लोकनियुक्त सरपंच पदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळालं आहे. त्यामुळे सी आर पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत त्यांना गावातच पराभव स्वीकारावा लागल्याची चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्राम पंचायत निवडणुकीत सी आर पाटील यांच्या कन्येचा पॅनल निवडणूक रिंगणात होता.

गुजरातच्या निवडणूक प्रक्रियेत मोलाचा वाटा असलेल्या सी आर पाटलांच्या कन्या निवडणूक रिंगणात असल्याने संपूर्ण राज्याचे मोहाडीच्या निवडणुकीकडे लक्ष लागून होते.

मोहाडी गावात भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. विशेष म्हणजे सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता.

दरम्यान सी आर पाटील यांच्या कन्या यांचा पॅनल पराभूत झाला असला तरी त्या स्वतः सदस्य पदी निवडून आल्या आहेत. सी आर पाटलांचाच एकप्रकारे हा परभव मानला जात असून राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा आहे.