नाशिकमध्ये ई बाइकला मागणी, सीएनजी कारला वर्षाची वेटिंग

| Updated on: Sep 11, 2021 | 10:44 AM

नाशिकमध्ये (Nashik) गणेशोत्सवाने (Ganesh Fest) मरगळलेल्या बाजारपेठेत (auto market) चैतन्य आणले आहे. वाहन बाजारात ग्राहकांची ई बाइकला (e-bikes) पसंदी असून, सीएनजी कारला चक्क वर्षभराचे वेटिंग करावे लागत आहे.

नाशिकमध्ये ई बाइकला मागणी, सीएनजी कारला वर्षाची वेटिंग
संग्रहित
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) गणेशोत्सवाने (Ganesh Fest) मरगळलेल्या बाजारपेठेत (auto market) चैतन्य आणले आहे. वाहन बाजारात ग्राहकांची ई बाइकला (e-bikes) पसंदी असून, सीएनजी कारला चक्क वर्षभराचे वेटिंग करावे लागत आहे. (Demand for e-bikes in Nashik, waiting year for CNG cars)

गणेशोत्सवापासून सणांना सुरुवात होते. एकापाठोपाठ एक येणारे सण बाजारात उत्साह आणतात. कोणी गणपती उत्सवात, तर कोणी दसऱ्याला मोठ्या खरेदीची प्लॅनिंग करतो. अनेक जण दिवाळी पाडव्याला खरेदी करण्याचे नियोजन करतात. विशेषतः या काळात दुचाकी वाहन विक्री आणि चारचाकी वाहन विक्री तुफान होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बाजाराचे गणित बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे सारे जग ठप्प झाले होते. त्यात वाहन निर्मिती करणारे कारखाने बंद राहिले. कच्च्या मालाचा पुरवठा रखडला. सोबतच नागरिकांच्या खिसे रिकामे झाले. यामुळे वाहन विक्रीत आलेली मरगळ अजूनही म्हणावी तशी झटकलेली नाही. त्यातच वाहनांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक दुकाची आणि चारचाकी ग्राहक जुनी वाहने विकत घेण्यासाठी पसंदी देत असल्याचे दिसत आहे.

दुचाकी लाखाच्या घरात

सध्या बाजारात स्कूटर असो की, बाइक प्रत्येक दुचाकीच्या किमती या जवळपास लाखाच्या घरात गेल्या आहेत. त्यात पेट्रोल शंभर रुपयांच्या पुढे जात आहे. यामुळे अनेकजण वाहन विक्रीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी वेगवेगळ्या ऑफर बाजारात आणल्या आहेत. त्यात कमी डाऊन पेमेंट, आकर्षक व्याजदर, कमी हप्ता यांचा समावेश आहे, अशी माहिती होंडाच्या सीईओंकडून देण्यात आली.

ई बाइकवर अनुदान हवे

पेट्रोल शंभरीपार गेल्याने वाहनधारक ई बाइकचा पर्याय चाचपडताना दिसत आहे. या बाइकच्या किमतीही लाखाच्या घरात आहेत. मात्र, फक्त चार्जिंग करावी लागत असल्याने पेट्रोलच्या खर्चाची चिंता नाही. त्यामुळे ई बाइकची विचारणा आणि मागणी वाढली आहे. मात्र, पर्यावरणाला हातभार म्हणून सरकारने या खरेदीवर काही अनुदान द्यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होताना दिसत आहे.

सीएनजी कारची प्रतीक्षा

मलेशियातील लॉकडाऊनमुळे सेमी कंडक्टरच्या आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनीच्या सीएनजी कारला सध्या सहा महिने ते वर्षाची वेटिंग करावी लागत आहे. अनेक ग्राहक पुढच्या सणाचे गणित धरून या कारची बुकिंग करून ठेवत आहेत. मात्र, येणाऱ्या काळात वाढत्या इंधनाच्या किमती पाहता ई आणि सीएनजी वाहनांची मागणी वाढणार आहे. (Demand for e-bikes in Nashik, waiting year for CNG cars)

इतर बातम्याः

ताशाचा आवाज तरारा झाला रं, गणपती माझा नाचत आला!

नाशिकमध्ये महापालिका सुरू करणार सीबीएसई शाळा