नाशिकमध्ये महापालिका सुरू करणार सीबीएसई शाळा

महापालिका (Municipal Corporation) शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांनी फिरवलेली पाठ पाहता आता नाशिकमध्ये (Nashik) महापालिका सीबीएई (CBSE school) शाळा (ZP school) सुरू करणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पुढाकार घेतला आहे.

नाशिकमध्ये महापालिका सुरू करणार सीबीएसई शाळा
नाशिक महापालिका

नाशिकः महापालिका (Municipal Corporation) शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांनी फिरवलेली पाठ पाहता आता नाशिकमध्ये (Nashik) महापालिका सीबीएई (CBSE school) शाळा (ZP school) सुरू करणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. (Municipal Corporation to start CBSE school in Nashik)

नाशिकमध्ये सीबीएसई शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. आगामी स्पर्धेचे युग लक्षात घेता पालकही इंग्रजी माध्यमांच्या सेमी किंवा सीबीएई शाळेत मुलांचा प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थी क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. हे प्रमाण असेच सुरू राहिले, तर आगामी काळात महापालिका शाळांवर संक्रात येऊ शकते. विद्यार्थ्यांअभावी या शाळा बंद कराव्या लागू शकतात. त्यामुळे काळाची पावले ओळखून महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नाशिकमध्येही महापालिकेच्या सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या शाळा इतर शाळांसारख्या स्मार्ट असणार आहेत. त्यामुळे महापालिकेतील भविष्यात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचा प्रश्नही आपोआप सुटणार आहे.

औरंगाबादमध्येही प्रयोग

औरंगाबाद महापालिकेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे अनेक शाळा बंद कराव्या लागल्या होत्या. हे पाहता तिथेही महापालिका प्रशासनाने पालिकेच्या सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या धरतीवर दोन शाळा सुरू करण्यात आला. शाळा सुरू झाल्याच्या काही दिवसांत या शाळांमधील प्रवेश फुल्ल झाले. त्यामुळे औरंगाबादमध्ये महापालिका सीबीएसई शाळांची संख्या वाढविण्याच्या विचारात आहे.

इतर शाळांपेक्षा फी राहणार कमी

नाशिक, औरंगाबादमध्ये सीबीएसई शाळेची फी वर्षाकाठी लाखाच्या घरात जाते. सर्वसामान्य पालकांना आपल्या पाल्याची इतकी फी भरणे शक्य नसते. त्यामुळे त्यांचा ओढा हा कमी फी असणाऱ्या शाळांकडे असतो. आता महापालिका स्वतःच सीबीएसई शाळा सुरू करणार असल्यामुळे त्यांची फी सुद्धा अतिशय कमी असेल. हे पाहता नाशिकमध्ये या शाळांनाही चांगला प्रतिसाद मिळेल आणि सर्वसामान्य पालकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण अतिशय कमी शुल्कात मिळणे शक्य होणार आहे.

पालिका भूखंड बीओटीवर विकसित करणार

नाशिक महापालिका शहरातील काही भूखंड आता बीओटी तत्त्वावर विकसित करणार आहे. त्यासाठी काटेकोर आणि महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने अंमलबजावणी केली जाईल, असा निर्धार पालिका आयुक्तांनी केला आहे. सुरुवातीला नाशिक महापालिकेच्या मालिकीचे १२ भूखंड हे पीपीपी तत्त्वावर विकसित केले जाणार असल्याचे समजते.(Municipal Corporation to start CBSE school in Nashik)

इतर बातम्याः

अहो सोने स्वस्त! गेल्या महिन्याच्या तुलनेत 790 रुपयांची घसरण!!

विघ्नहर्त्या बाप्पांची या मुहूर्तावर करा प्राणप्रतिष्ठा!

नाशिकमध्ये अनोखी हेल्मेट सक्ती, नियम मोडल्यास दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI