AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत भेटीगाठींना वेग, अमित शाह, एकनाथ शिंदेंच्या भेटीचं कारण समोर

मोठी बातमी समोर येत आहे, आज एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीवर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिल्लीत भेटीगाठींना वेग, अमित शाह, एकनाथ शिंदेंच्या भेटीचं कारण समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 06, 2025 | 2:57 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असून, गाठीभेटींना वेग आला आहे. काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भेटणार आहे. आज एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व खासदारांसह अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. आता या भेटीवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘ सर्व खासदारांसोबत मी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. खासदारांचे देखील काही विषय होते, ते या भेटीदरम्याान मी मांडले. मागच्या आठवड्यात देखील मी आलो होतो. त्यावेळी मी अमित शाह यांना भेटलो नव्हतो. आज सदिच्छा भेट झाली आणि खासदारांसदर्भातील काही विषय होते, ते ही मांडले. मी तर जाहीरपणे भेटतोय, खासदारांसोबत भेटतोय, जे काही विकासात्मक प्रकल्प आहेत, केंद्र आणि राज्य सरकार यांचे, जे प्रकल्प राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून सुरू आहेत, अशा प्रकल्पांसंदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा झाली.  दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे, मी लपून छपून काही काम करत नाही. मी जे करतो ते सगळ्यांच्या समोर करतो,’ असं या भेटीवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींचीही घेणार भेट  

एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, आपल्या या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू आहेत. थोड्यावेळापूर्वी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली, ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील अमित शाह यांची भेट घेतली होती.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था