मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना मोठे आदेश, थेट बैठकीचे..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्सन मोडवर आहेत. त्यांनी नुकताच मंत्र्यांना मोठे आदेश दिले. एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाला एका मागून एक मोठे धक्के देताना एकनाथ शिंदे दिसत आहेत.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना मोठे आदेश, थेट बैठकीचे..
Eknath Shinde
| Updated on: Jul 04, 2026 | 1:04 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका मागून एक मोठे धक्के शिवसेना ठाकरे गट आणि थेट उद्धव ठाकरेंना देत आहेत. राज्यात ऑपरेशन टायगर राबवले जातंय. याच ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 6 शिवसेना शिंदे गटाचे खासदार फोडले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वास सहकारी आणि नेते सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापती पद दिले. एकनाथ शिंदे ठाकरे गटाला मोठी सुरंग लावताना दिसत आहेत. कालही एकनाथ शिदेंनी मोठा धक्का ठाकरेंना दिला. शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवले जातंय. खासदारांनंतर काही आमदारही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले जातंय. लवकरच मोठी पक्षफुटी अजून एकदा ठाकरेंच्या गटात होईल, असे सांगितले जातंय. एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आहेत. काल रात्री उशिरा ठाण्यात मोठा पक्षप्रवेश देखील पार पडला. यादरम्यानच एकनाथ शिंदे यांनी काही मोठ्या सूचना मंत्र्यांना दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना अत्यंत मोठे आदेश

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना मोठे आदेश दिली आहेत. आषाढी एकादशिनिमित्त एकनाथ शिंदे यांचे सर्व संबंधित मंत्र्यांना आजपासून कामाला लागण्याचे आदेश आहेत. वारकरी यांना अपेक्षित असलेल्या सगळ्या उपाययोजना करा असे संबंधित नेत्यांना आदेश दिले. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत.

पंढरपूरमध्ये महत्वाच्या बैठकीचे आयोजन 

आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आयोजित पालखी मार्गावरील आरोग्य सुविधांचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. विठ्ठल मंदिरातील सुविधांचाही आढावा घेतला जाणार आहे. थेट एकनाथ शिंदे यांनीच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

आषाढी एकादशिनिमित्त महत्वाची बैठक आयोजित 

सरकारकडून आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या जात आहेत. वारकऱ्यांना सर्व सुविधा वारीदरम्यान मिळाव्यात, याकरिता काम केले जात आहे. यासंदर्भातच आज पंढरपूरमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर ते पांडूरंगाचे दर्शनही घेतील.

Follow Us