AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल, अचानक प्रकृती खालावली, अतिताणामुळे..

Eknath Shinde Health : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील एका रूग्णालयात एकनाथ शिंदे असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल, अचानक प्रकृती खालावली, अतिताणामुळे..
Eknath Shinde Health
| Updated on: Jul 05, 2026 | 1:34 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टागयरमध्ये व्यस्त आहेत. काल रात्री उशीरा गंगुबाई शिंदे सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री सव्वा एकपर्यंत पक्षप्रवेश सुरू होते. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना थेट रूग्णालयात दाखल करण्यात आले. एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्याचे पावसाळी अधिवेशन आणि ऑपरेशन टायगरदरम्यान त्यांची मोठी धावपळ सुरू होती. अचानक त्यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या निगरानीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती मिळत आहे. सततच्य दगदगीमुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे कळतंय. विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. तोही त्यांनी अंगावर काढला. त्यानंतर त्यांची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.

शुभांगी पाटील यांच्याही पक्षप्रवेशादरम्यान एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्येच शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश होणार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने ते या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते.

ऑपरेशन टायगरमध्ये दिल्लीला त्यांच्या चक्कर होत आहेत. शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. यासोबतच मुंबईमधील ठाकरे गटाचे महत्वाचे नेते म्हणून सचिन आहिर यांच्याकडे बघितले जाते. सचिन आहिर हे देखील शिंदे गटाच्या गळ्याला लागले. त्यांना थेट विधान परिषदेचे उपसभापतीपदही मिळाले.

ठाकरे गटाला एका मागून एक धक्के एकनाथ शिंदे यांच्याकडून दिली जात आहेत. एकनाथ शिंदे सक्रिय आहेत. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानेही एकनाथ शिंदेंची धावपळ सुरू आहे. त्यामध्येच आता त्यांची प्रकृती खालावली आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या तरी स्थिर असली तरीही डॉक्टरांचे बारीक लक्ष आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ