AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्रि‍पदाची शपथ घेणाऱ्या दोन खासदारांची नावं आली समोर, शिंदे आज दुपारी दिल्लीत

Eknath Shinde : उद्धव ठाकरे एकाबाजूला जोरदार टीका करत असताना दुसऱ्याबाजूने एकनाथ शिंदे जास्त न बोलता ठाकरे गटाला हादरे देत आहेत. आता अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मोदी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे.

Eknath Shinde : मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्रि‍पदाची शपथ घेणाऱ्या दोन खासदारांची नावं आली समोर, शिंदे आज दुपारी दिल्लीत
Eknath Shinde
| Updated on: Jul 01, 2026 | 11:33 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चालींनी सध्या उद्धव ठाकरे गट बेजार झाला आहे. मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटाचे सहाखासदार फोडले. काल सचिन अहिर यांच्या रुपाने विधान परिषदेतील आमदार फोडला. त्यामुळे सध्या ठाकरे गटाची वाताहात सुरु आहे. उद्धव ठाकरे एकाबाजूला जोरदार टीका करत असताना दुसऱ्याबाजूने एकनाथ शिंदे जास्त न बोलता ठाकरे गटाला हादरे देत आहेत. आता अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर मंत्रि‍पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत.

श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. मागच्या 12 वर्षांपासून ते खासदार आहेत. आता ऑपरेशन टायगरमध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे यांची महत्वाची भूमिका होती. पक्ष विस्तारासाठी सतत त्यांचे दौरे सुरु असतात. आता त्यांच्यावर मंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा आहे. फुटलेल्या खासदारांपैकीही एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर यांचे नाव मंत्रि‍पदासाठी आघाडीवर आहे. फुटलेल्या सहा खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांचीच सर्वात जास्त चर्चा झाली. ओमराजे निंबाळकर यांचा तळागाळातील कार्यकर्ते, जनता यांच्याशी संपर्क आहे. ठाकरे गटाकडून त्यांच्यावरच सर्वात जास्त टीका करण्यात आली. ओमराजे निंबाळकर स्वत: ग्राऊंडवर उतरुन काम करतात. लोकांच्या प्रश्नाना भिडतात. त्यामुळेच ओमराजे निंबाळकर यांच्या रुपाने आणखी एका तरुण खासदाराला एकनाथ शिंदे मंत्रि‍पदाची संधी देतील अशी चर्चा आहे.

NDA मध्ये भाजपनंतर सर्वाधिक खासदार कुठल्या पक्षाकडे?

ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेनेत आल्याने केंद्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचं बळ वाढलं आहे. भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत त्यांच्या पक्षाकडे आता एकूण 13 खासदार झाले आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आता जास्त खासदार आहेत. टीडीपीकडे 16 खासदार आहेत. मागच्यावर्षी सरकार आल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला एकच मंत्रिपद मिळालं होतं. एनडीएमध्ये अन्य पक्षांकडे सुद्धा एक-एकच मंत्रिपद होतं. पण आता मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांच्या मंत्रि‍पदाची संख्या वाढू शकते.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर