वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल, अजित पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन 

अन्यथा महावितरण कंपनीला नाईलाजास्तव वीजजोड तोडावा लागेल, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Appeal Farmer To Pay Light Bill)

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल, अजित पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन 

बारामती : सरकारने शेतीपंपासाठी निम्मे वीजबिल भरण्याची योजना सुरु केली आहे. त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपली वीजबिले अदा करावीत. अन्यथा महावितरण कंपनी आणि पर्यायाने शेतकरीही अडचणीत येतील, असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. (Ajit Pawar Appeal Farmer To Pay Light Bill)

माळेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिल्या. यावेळी अजित पवारांनी शेतीपंपाच्या थकीत वीजबिलावर भाष्य केलं.

“आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाचे निम्मे वीजबिल भरण्याची योजना सुरु केली आहे. महावितरण कंपनीला तब्बल 40 हजार कोटी रुपये येणे आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी तातडीने निम्मे वीजबिल भरुन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. अन्यथा महावितरण कंपनीला नाईलाजास्तव वीजजोड तोडावा लागेल,” असे अजित पवार म्हणाले.

“त्यातून शेतकऱ्यांचीच अडचण होणार आहे. पर्यायाने महावितरण कंपनी अडचणीत येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली थकीत बिले त्वरीत अदा करावीत,” असे आवाहन अजित पवारांनी केले.

नोटिशीची मुदत 30 जानेवाराली संपणार

ग्राहकांनी वीजबिल न दिल्यामुळे महावितरण विभागाला गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महसुली तूट वाढल्यामुळे महावितरणला आपला कारभार करण्यासाठी कसरत करावी लागतीये. त्यामुळे सरकारने थकित वीजबिलाबाबत कडक भूमिका घेतली आहे. सरकारने राज्यात वीजबिल थकलेल्या तब्बल 71 लाख 68 हजार 596 विजग्राहकांना थेट नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत ग्रहाकांना थकित वीजबिल भरण्याचे बजावण्यात आले आहे.

वीजबिल न भरल्यास वीज कापणार

निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास विजजोडणी कापण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. वीजबिल भरण्यासाठीची मुदत 30 जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर विजेची जोडणी कापण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसे आदेश सरकारने महावितरणला दिले आहेत. (Ajit Pawar Appeal Farmer To Pay Light Bill)

संबंधित बातम्या : 

नाहीतर ठेकेदाराला बघून घेतो, उपमुख्यमंत्री अजितदादांनी भरला दम!

अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्व; मुणगेकरांची खोचक टीका

Published On - 6:18 pm, Sun, 31 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI