शिंदे यांच्या मंत्रिमंडळापेक्षा फडणवीस यांची टीम कशी वेगळी?, महायुतीने कशी साधली सर्व समीकरणं, पाहा

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची संख्या आणि स्वरुप दोन्हीही भिन्न आहे. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्री आणि एकूण २९ मंत्री सामील होते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असले तर एकूण मंत्र्‍यांची संख्या तब्बल ४२ आहे. शिंदे यांच्या सरकारपेक्षा फडणवीस सरकारमध्ये १३ मंत्री जास्त आहेत.

शिंदे यांच्या मंत्रिमंडळापेक्षा फडणवीस यांची टीम कशी वेगळी?, महायुतीने कशी साधली सर्व समीकरणं, पाहा
| Updated on: Dec 16, 2024 | 4:02 PM

अखेर बहुप्रतिक्षित महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये एकूण ३९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. ज्यात ३३ जणांनी कॅबिनेटची तर ६ जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची टीम वेगळी आहे. सत्तेचा चेहराच नाही तर मंत्रिमंडळाची संख्या आणि स्वरुप देखील बदलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळात सहकारी पक्षांना सामावून घेण्यासोबत जातीय समीकरण आणि प्रादेशिक बॅलन्स देखील सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे..अनेक दिग्गजांना घरी बसवून नव्या चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची संख्या ४२ झाली आहे.महाराष्ट्रात कमाल ४३ मंत्री बनविता येतात, रविवारी ३९ मंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे. ज्यामुळे एका कॅबिनेट मंत्री पदाची जागा रिक्त आहे. फडणवीस यांच्या सरकारात चार महिलांना संधी मंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. यात भाजपाच्या कोट्यातून तीन आणि...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा