मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, थेट फडणवीसांकडून जाहीर, या तारखेला जीआर निघणार

मुख्यमंत्री वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड तालुक्यातील म्हसला दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्या आपण कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार आहोत, असं थेट फडणवीसांना जाहीर केलं.

मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, थेट फडणवीसांकडून जाहीर, या तारखेला जीआर निघणार
devendra fadnavis and drought
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 2:59 PM

Farmer Drought Update : सध्या राज्यात दुष्काळाच्या झळांमुळे शेतकरी हैराण आहेत. कापूस, सोयाबीन, तूर, मूग अशा प्रकारची पिकं करपून गेली आहेत. पीक उन्हामुळे जळून गेल्याने काही शेतकऱ्यांनी तर शेतात नांगर फिरवलाय. दुसरीकडे दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभर दौरा करत आहेत. पिकांची स्थिती कशी आहे, याची पाहणी करत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जातेय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशीही मागणी होत आहे. दरम्यान, आता दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची तारीखच सांगून टाकली आहे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड तालुक्यातील म्हसला दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्या आपण कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार आहोत, असं थेट फडणवीसांना जाहीर केलं. आपण सगळ्यांना सर्व मदत आपण करणार आहोत. आपण शेतकऱ्यांना विम्याचेसुद्धा पैसे देणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी काय काय मागण्या केल्या?

दुसरीकडे विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारकडे मोठ्या मागण्या केल्या आहेत. सरकारने तातडीने दोन ते तीन दिवसांसाठी अधिवेशन बोलवावे. तसेच ठिकठिकाणी सेनेच्या मदतीने टेन्ट उभारावेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने केंद्राकडून मदत मागवावी, अशा काही मागण्या ठाकरे यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी फक्त दौरे करून काहीही होणार नाही. 40 ते 45 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी नेमके निकष काय असतील?

आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुष्काळ जाहीर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. उद्या याबाबतचा जीआरही निघणार आहे. त्यामुळे या जीआरमध्ये नेमकं काय असेल? शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेमके निकष काय असतील? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us