कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना मोठी खुशखबर! थेट खात्यावर पैसे जमा होणार…. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचा तिसरा हप्ता वितरित

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना मोठी खुशखबर! थेट खात्यावर पैसे जमा होणार.... देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण
farmer loan waiver
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 5:45 PM

Farmer Loan Waiver : राज्यात सध्या दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. सुरुवातीला काही तालुके दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले होते. आता वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलंय. आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. पंचनामे सुरू झाले आहेत. असे असतानाच आता शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 बाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या तिसऱ्या हप्त्यामध्ये 3.27 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 3161 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 15.86 लाख कर्जखात्यावर राज्य सरकारने 13,276 कोटी रुपये लाभ वितरित केले आहेत.

Loading...

सरकारने आणखी काय काय निर्णय घेतले?

दुसरीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने आणखी काही निर्णय घेतले आहेत. सरकारने शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कर्जवसूलीला स्थगिती देण्यात आलीय. तसेच पंचनामे झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना आणखी काही मदत देणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us