डिलिमिटेशन बिल पास झाल्यानंतर एससी, एसटीच्या राखीव जागांचं काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समीकरण सांगितलं

डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत जुना निर्णय आठवण करून दिला. 2023 मध्ये पाठिंबा दिला, मग आता विरोध का? असा सवाल त्यांनी केला.

डिलिमिटेशन बिल पास झाल्यानंतर एससी, एसटीच्या राखीव जागांचं काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समीकरण सांगितलं
Devendra Fadnavis On Delimitation
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 3:45 PM

गोविंद ठाकूर, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी : डिलिमिटेशन बिलावरुन सध्या देशात वातावरण तापलेलं आहे. अनेक नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहे. शरद पवार आणि विशेषतः दोन्ही एनसीपीचे गट चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शरद पवारांनी या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात विधेयकाला पाठिंबा कोण कोण देणार हे स्पष्ट होणार आहे. विधेयकाच्या बाजूने किती मतदान होणार आणि किती विरोधात होणार हे समोर येईल. दरम्यान, विधेयकाला राज्यातून विरोध होत असल्याचं पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी टीका केली आहे. राज्यातले मुख्य पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी विधेयकाच्या विरोधात सूर आवळला आहे. डिलिमिटेशनला विरोध करणे म्हणजे लबाडी आहे. 2023 मध्ये सर्वांनी एकमताने नारीशक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा दिला, आता विरोध करतात, असं म्हणत फडणवीसांनी जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

डिलिमिटेशनला विरोध करणाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. 2023 मध्ये नारीशक्ती वंदन विधेयकाला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला होता. त्यावेळी महिला आरक्षणाला समर्थन दिलं, मग आता विरोध का केला जात आहे? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. दक्षिण भारतातील 120 खासदारांपैकी 75 खासदारांनी डिलिमिटेशनला समर्थन दिल्याचा दावाही त्यांनी केला.

Loading...

फडणवीस म्हणाले, डिलिमिटेशनला विरोध करणे म्हणजे लबाडी आहे. आधी संविधान वाचलं पाहिजे, संविधानाची माहिती घेतली पाहिजे. 2023 मध्ये महिला आरक्षणाला पाठिंबा दिला, तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की आरक्षण लागू होणार नाही? आता महिला आरक्षण कसं थांबवायचं आहे? असा सवाल त्यांनी केला.

33 टक्के महिला संसदेत प्रवेश करतील. राहुल गांधी यांनी 2023 मध्ये हे विधेयक का मांडलं नाही? याआधी डिलिमिटेशन झालं नव्हतं का? असा सवालही फडणवीसांनी केला. वाढलेल्या जागांमध्ये राखीव जागा असतील, तसेच महिला जागांमध्ये एसटी आणि एससीच्या जागाही राखीव असतील, असं त्यांनी सांगितलं. शरद पवार यांच्याबाबत बोलताना आता खूप उशीर झाला आहे, असं फडणवीस म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us