देवेंद्र फडणवीस यांचा थेट उद्धव ठाकरे यांना मोठा सवाल, म्हणाले, मी तयार…

Devendra Fadnavis interview : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिले. मुंबई तोडणार या आरोपावरही त्यांनी भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस यांचा थेट उद्धव ठाकरे यांना मोठा सवाल, म्हणाले, मी तयार...
Devendra Fadnavis
| Updated on: Jan 12, 2026 | 11:30 AM

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटावर केले. उद्धव ठाकरे यांनी भाजपासह देवेंद्र फडणवीसांवर काही आरोप केले. त्यावर बोलताना आता देवेंद्र फडणवीस दिसले. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये म्हटले होते की, भाजपा सर्वकाही गुजरातला घेऊन जात आहे. भाजपाच्या हातात सत्ता गेली तर अजून काही मोठे प्रकल्प ते गुजरात पळवतील. यावरच बोलताना आता देवेंद्र फडणवीस दिसले. देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की, नवी मुंबई विमानतळाचा प्लॅन मी तयार केला आहे का? यासोबतच त्यांनी अदानींना मुंबई विमानतळाचे डेंटर कसे मिळाले हे देखील त्यांनी सांगितले. उत्तर नसतात. तेव्हा मुंबई तोडणार मुंबई तोडणार म्हणतात. अरे घासली. तीच तीच कॅसेट काय लावता. मी त्यांना सारखं सांगतो. किती दिवस एकच स्क्रीप्टरायटर ठेवणार. ते जुने झाले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या पेक्षा मुर्खपणाचं दुसरं स्टेटमेंट असू शकत नाही. मुंबईला दोन एअरपोर्टची गरज होती. दुसरा आम्हीच बांधला. विकास थांबला असेल मुंबईचा तर केवळ एका एअरपोर्टने. मुंबईच्या एअरपोर्टचा प्लान मी केला नाही. 1992 पासूनचा प्लान होता. कुणीच काही केलं नाही. मी हे काम हाती घेतले. हा अदानीचा नव्हता. तो जीव्हिकेला आम्ही दिला होता. जीव्हिकेने चार वर्ष काम करून शेअर विकले. ते अदानीने टेकओव्हर केले.

यामुळे आम्ही मुंबई विमातळाचे काम अदानीला दिले म्हणणे साफ चुकीचे आहे. संपूर्ण देशात बंदर बांधण्यासाठी सर्वोत उत्तम जागा वाढवणची आहे. नॅचरल डीप ड्राफ्ट वाढवण सारखं कुठेच नाही. कोणत्याच राज्यात नाही. जगातील मोठं जहाज हे वाढवणलाच येतं. 90 च्या दशकात वाढवण बंदर बांधण्याचा निर्णय झाला.

भाजपावर नवी मुंबई विमानतळाच्या मुद्द्यावरून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप केला जात आहे की, भाजपाला सर्वकाही गुजरातमध्ये न्यायचे आहे.