Pandharpur Vitthal Rukmini Mandir | माघवारी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात भाविकांची मांदियाळी

प्रदीप गरड

Updated on: Feb 12, 2022 | 3:25 PM

माघ शुद्ध जया एकादशी (Ekadashi) निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक आणि नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. माघवारी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून जवळपास तीन लाख भाविक पंढरीत (Pandharpur) दाखल झालेत.

माघ शुद्ध जया एकादशी (Ekadashi) निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक आणि नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. माघवारी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून जवळपास तीन लाख भाविक पंढरीत (Pandharpur) दाखल झालेत. कोरोनाचा (Corona) संसर्ग कमी झाल्यानंतर भरणारी ही पहिलीच  माघीवारी आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात श्री विठ्ठल नामाच्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. चंद्रभागेच्या तिरी ही भाविकांची मांदिआळी दिसून येत आहे. श्री विठ्ठल नामाच्या जय घोषाने अवघी पंढरी नगरी  दुमदुमली आहे. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मनमोहक रूप पाहून भाविक आनंदी आनंद झालेत. कोरोनाचे नियम पाळून भाविक आपल्या विठुरायाचे तसेच माता रुक्मिणीचे दर्शन घेत आहेत. कोरोनाचा नायनाट करावा, असंच साकडं भाविकांनी विठ्ठलाकडे घातलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI