करूणासोबतच्या संबंधांची कबुली, बलात्काराचे आरोप धनंजय मुंडेंनी फेटाळले

धनंजय मुंडे यांनी तक्रारदार रेणू शर्मा यांच्या बहीण करुणा शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांची कबुली दिली आहे (Dhananjay Munde reaction on allegations of Rape).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:35 PM, 12 Jan 2021

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात गायिका रेणू शर्मा यांनी पोलिसात बलात्काराची तक्रार केली आहे. याप्रकरणी सोमवारी (11 जानेवारी) अर्ज दाखल केल्यानंतर सामाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त समोर आले. त्यानंतर आज (12 जानेवारी) धनंजय मुंडे यांनी स्वत: फेसबुकवर याबाबत आपली बाजू मांडली आहे. या भूमिकेत मुंडे यांनी तक्रारदार रेणू शर्माचे बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत. मात्र, तक्रारदार रेणू शर्मा यांच्या बहीण करुणा शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांची कबुली दिली आहे (Dhananjay Munde reaction on allegations of Rape).

तक्रारदार रेणू शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, मी जेव्हापासून त्यांना ओळखते तेव्हा ते कुणीच नव्हते. 1996 पासून मी त्यांना ओळखते. त्यांनी २००६ पासून वारंवार माझ्यावर बलात्कार केला. घरात कुणी नसताना ते घरी यायचे. 2006 साली माझी बहीण बाळंतपणासाठी इंदौर गेली होती तेव्हा ते आले होते. तेव्हापासून त्यांनी अत्याचार सुरु केला. 2008 मध्ये माझ्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या सर्व घडामोडी मी तक्रारीत सांगितल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया रेणू शर्मा यांनी दिली.

“2005 सालाच्या आधीपासूनच त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. तू माझ्या मुलांची आई बनणार का? माझी पत्नी होणार का? असं धनंजय मुंडे म्हणायचे. त्यावेळी तर मला या सर्व गोष्टींबाबत अक्कलही नव्हती. मी आयुष्यात काहीतरी करु इच्छित होती. मात्र, मला माहित नव्हतं की, इतकं विचित्र काहीतरी होईल”, असं म्हणत रेणू शर्मा रडू लागल्या (Dhananjay Munde reaction on allegations of Rape).

रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे यांनी रेणू शर्माचा व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ वारंवार दाखवून ते ब्लॅकमेल करुन संबंध ठेवायचे. रेणू या प्रकरणाने प्रचंड घाबरलेली. रेणू घाबरुन 2009 साली इंदौरला गेली. याप्रकरणी अजूनही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही”, असं वकील रमेश त्रिपाठी यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

1997 मध्ये ओळख झाल्याचा दावा, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचा आरोप, थेट पोलीस आयुक्तांनाच पत्र