Karjat-Jamkhed : हार्दिक, रोहित यांच्यासोबत धनंजय मुंडेंचीही तुफान बॅटिंग, धनंजय मुंडे म्हणतात….

| Updated on: Dec 17, 2021 | 9:32 PM

कर्जत-जामखेडमध्ये आज हार्दिक पटेल यांची सभा आयोजित करणात आली होती. त्या सभेला महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीतील काही मोठे नेतेही उपस्थित होते.

Karjat-Jamkhed : हार्दिक, रोहित यांच्यासोबत धनंजय मुंडेंचीही तुफान बॅटिंग, धनंजय मुंडे म्हणतात....
Follow us on

कर्जत-जामखेड : राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या मतदारसंघात म्हणजेच कर्जत-जामखेडमध्ये आज हार्दिक पटेल यांची सभा आयोजित करणात आली होती. त्या सभेला महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीतील काही मोठे नेतेही उपस्थित होते. याच सभेत काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि रोहित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनीही आपल्या भाषणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रोहित आणि हार्दिकमुळे मला क्रिकेटचे ग्राऊंड आठवले

सभेत बोलताना रोहित आणि हार्दिक या नावांमुळे मला लगेच क्रिकेटचे ग्राउंड आठवलं असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. संकटाच्या काळात तुमच्याविरोधात इथले मंत्री होते, मात्र दुष्काळाच्या काळात तुम्ही पाणी द्यायचं काम केलं. सामाजिक न्याय विभागात सर्वात जास्त पत्रे रोहित पवारांची होती असे म्हणत त्यांनी रोहित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आम्ही स्वप्न पाहिले आमचे मतदारसंघ बारामती सारखे व्हावे, तेच स्वप्न रोहित पवारांनी पाहिले, येत्या काळात हा मतदारसंघ दिल्लीत पोहचेल. असेही मुंडे म्हणाले. तर दोन वर्षात कोविडच्या काळात देखील कोविड सेंटर उभारले, सर्व मद्दत केली. मोठ्याच पोरग जरी असले तरी आज तुम्हाला तुमच वाटतंय. रोहित दादा तुमच नाव जेव्हा ठेवलं तेव्हा त्याचा संस्कृत अर्थ तुमच्या आई वडिलांना देखील माहीत नसेलस, रोहित म्हणे सूर्याचं किरण, असा त्यांच्या नवाच्या अर्थाचा उलगडाही धनंजय मुंडेंनी करून दिला.

ओबीसी आरक्षण, ईडीवरून केंद्रावर टीका

सर्व केंद्रीय संस्था सरकारचे काम करत आहेत, ईडीचे तर चव घालवली, अशा शब्दात धजनंय मुंडेंनी केंद्रावर टीका केलीय. काही म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि ओबीसी आरक्षण गेले. त्यांनी इतिहास तपासावा व्ही. पी. सिंग यांनी आणलेला आयोग जसाचा तसा स्वीकारला. Obc ची केस चालली त्यांच्या काळात, निकाल आमच्या काळात, आम्ही दोषी कसे? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

KRRameshKumar | ‘असं बोलूच कसं शकता तुम्ही!’ वाचाळवीर काँग्रेस आमदाराला प्रियंका गांधींनी सुनावलं

लघवीकरून आल्यावर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य..? काय आहे नेमकं बरोबर… तज्ज्ञ काय देतात सल्ला..?

John Abraham : ‘मी मोठ्या पडद्यावरचा हिरो, ओटीटीची कल्पनाही नाही करू शकत’