John Abraham : ‘मी मोठ्या पडद्यावरचा हिरो, ओटीटीची कल्पनाही नाही करू शकत’

जॉन अब्राहम (John Abraham) सध्या खूप बिझी आहे. नुकताच त्याचा 'सत्यमेव जयते 2' (Satyameva Jayate 2) हा सिनेमा आला. तो 'पठाण' (Pathan) चित्रपटात काम करत आहे. त्याचे सहकलाकार शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पदुकोण(Deepika Padukone)बद्दलही तो सांगतो.

John Abraham : 'मी मोठ्या पडद्यावरचा हिरो, ओटीटीची कल्पनाही नाही करू शकत'
जॉन अब्राहम
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 8:38 PM

मुंबई : जॉन अब्राहम (John Abraham) सध्या खूप बिझी आहे. नुकताच त्याचा ‘सत्यमेव जयते 2’ (Satyameva Jayate 2) हा सिनेमा आला. लोकांनी या सिनेमाचे आणि त्यातील गाण्यांचे खूप कौतुक केले. विशेषतः जॉन अब्राहमचा अभिनय लोकांना आवडला. तो सिनेमे तर करतोय पण जेव्हा त्याला OTTविषयी विचाले तेव्हा त्यानं त्याला नाही म्हटलंय.

‘जे पटते तेच बोलतो’ अभिनेता जॉन अब्राहम इतर लोकांना खूश करण्यासाठी काहीतरी उत्तर द्यायचं, यातला व्यक्ती नाही. तो त्याला जे पटते तेच बोलतो. जेव्हा आम्ही त्याला विचारलं, की त्याचे इतर मित्रमंडळी जी याच क्षेत्रात काम करतायत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून OTT प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलीज करणार का?

‘सबस्क्रिप्शन फीसाठी येण्याची कल्पनाही करवत नाही’ या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणतो, की मला विश्वास आहे, मी मोठ्या पडद्याचा हिरो आहे आणि मी असाच मोठ्या पडद्यावर येईन. पुढे ततो म्हणातो, या क्षणी, मी स्वतः सबस्क्रिप्शन फीसाठी येण्याची कल्पनाही करू शकत नाही, हे खूप कठीण आहे.

‘दुसरे काहीही करायला वेळ नाही’ माझे सर्व चित्रपट पुढील तीन वर्षांसाठी मोठ्या पडद्यासाठी डिझाइन केलेले आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षे तरी असेच राहणार आहे. सध्या माझ्याकडे मोठ्या पडद्यावरील चित्रपटांशिवाय दुसरे काहीही करायला वेळ नाही, असे तो म्हणाला.

‘कशाशीच तुलना होऊ शकत नाही’ 49 वर्षांचा हा अभिनेता हेही सांगतो, की थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याच्या अनुभवाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. एक उदाहरण घ्या. सूर्यवंशी हा सिनेमाच पाहू. तो मित्रांसोबत थिएटरमध्ये पाहा आणि अनुभल सांगा नंतर घरी जा आणि तुमच्या मोबाइल किंवा टॅबलेटवर पाहा. आता या दोघांची तुलना करा आणि फरक सांगा, असे तो म्हणतो. आम्ही ओटीटी चित्रपट बनवतो, त्या प्लॅटफॉर्मचा आम्ही आदर करतो. पण, काही चित्रपट ओटीटी चित्रपट नसतात, असे तो आवर्जून सांगतो.

शेड्यूल पॅक जॉन 2022मध्ये व्यस्त असेल. तो ‘पठाण’ (Pathan) चित्रपटात काम करत आहे. त्याचे सहकलाकार शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पदुकोण(Deepika Padukone)बद्दलही तो सांगतो. तर पुढे तो म्हणतो, माझा चित्रपट ‘अटॅक’ (Attack) 2022च्या प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे. त्यानंतर ‘एक व्हिलन’ जूनमध्ये. मला ‘पठाण’बद्दल काहीच माहिती नाही. कारण आम्ही अद्याप शूटिंग पूर्ण केलेले नाही.

Oo Antava.. Oo Oo Antava : समंताच्या गाण्याचा धुमाकूळ, बेभान होऊन थिएटरमध्ये थिरकतायत चाहते…

जॅकलिन, नोरा, शिल्पासह ‘या’ 12 अभिनेत्रींसोबत सुकेशचे क्लोज कनेक्शन? ईडीसमोर खळबळजनक खुलासे

RRR : आरआरआरच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये होणार करण जोहरचा फिल्टर आरआर कॉफी, आलियाही लावणार हजेरी

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.