
बीडमध्ये आज ओबीसी समाजाकडून एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते हजर आहेत. आजच्या या सभेत धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली आहे. ‘मला तर कधीपासून पाडीतच म्हणतो. भुजबळ साहेबांनाही म्हणतो, पाडीतोच… पण मी विक्रमी मतांनी निवडून आलो आहे असं मुंडे यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
धनंजय मुंडे म्हणाले की, ‘दोन अडीच महिने गप्पच होतो. मला तर बोलू द्या. आज या मी इथे उभा आहे. मी कुणाला विरोध करण्यासाठी आहे. मी इथे ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी उभा आहे. आमचे मार्गदर्शक, नेते भुजबळ साहेब आहेत. तुम्ही खंत व्यक्त केली की आज मुंडे साहेब असते तर ही वेळ आली नसती. मुंडे साहेबांची बरोबरी कोणी करू शकत नाही. ओबीसी हक्कांसाठी तुम्ही हयात घातली. आज कार्यकर्ते म्हणून आम्ही इथे आहोत. मला विचारलं तुम्ही बीडच्या सभेला येणार का. मी म्हटलं का बरं. म्हटलं, मी तर येणारच आहे.
पुढे बोलताना घनंजय मुंडे म्हणाले की, ‘आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जातीचे सर्व एकत्र नांदत होते. दोन वर्षापासून एका व्यक्तीने एका प्रवृत्तीने मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजात अंतर पाडलं. हे अंतर कुठून पडलं. आज माझा मराठा समाजाला नम्र हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त दोन समाजात अंतर पडलेले नाही. तर तुमच्याशीही तो दगाफटका करत आहे. उदाहरणासह सांगतो. 13 कोटी जनतेसमोर यावं. खरा फायदा मराठ्यांचा ओबीसीत नाही. त्यांचा फायदा ईडब्ल्यूसीमध्ये आहे.
ओबीसीत का यायचं आहे तर मूठभर लोकांना सरपंचापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत जायचं आहे. यांना पेटवायचं आहे. पेटवून पेटवून काय म्हणतो. कधी कधी माणूस असण्याची, जिवंत असण्याची हे ऐकून कसं सहन करावं याची मनाला भीती वाटते. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं आणि माझं काहीच सोडलं नाही. मला तर कधीपासून पाडीतच म्हणतो. भुजबळ साहेबांनाही म्हणतो, पाडीतोच. अरे 1 लाख 42 हजार मतांनी आलो. पाडितो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतो. आज आपल्या ओबीसींचं आरक्षण न्याय हक्कासाठी हा एल्गार मोर्चा आहे. आपल्या हक्काचं आरक्षण कुणाला देऊ द्यायचं नाही.
किती डोकेबाज माणूस समजायचं. दसरा संपल्यावर म्हणतो धनगरांचं 94 चं आरक्षण काढा. याला जीआर तरी कळतो का. वंजाऱ्याचंही आरक्षण काढतो. काय काढा. द्यायचं सांगा. काहीही बोलून जमणार नाही. काही दिवस माणसं येडे करताल. पण खऱ्याला खरं आज ना उद्या कळणार आहे. आपल्याला गावगाडा सांभाळायचा आहे. आपल्याला कुणाचा द्वेष करायचा नाही. आपला संताप एक व्यक्ती आणि एका प्रवृत्तीला आहे. बाकी कुणाला नाही.