Gopinath Munde: अप्पा, वंचितांच्या कल्याणाचा वसा आजही आमच्यात आहे, तो प्राणपणाने जपणार! धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. तसेच वंचितांच्या लढ्याचे प्रश्न आपण सोडवणार असल्याचे वचन दिले. तसेच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तही धनंजय मुंडे यांनी पवार यांना शुभेच्छा दिल्या.

Gopinath Munde: अप्पा, वंचितांच्या कल्याणाचा वसा आजही आमच्यात आहे, तो प्राणपणाने जपणार! धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली
धनंजय मुंडे यांची गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली
| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 12:19 PM

बीडः भाजपचे एकेकाळचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे (Goprinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरातून विविध नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करून गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथरावांना आदरांजली वाहताना एक भावूक ट्विट केलंय. त्यात म्हणाले, अप्पा, तुम्ही आज आमच्यात नाहीत. पण वंचितांच्या कल्याणाचा तुम्ही घेतलेला वसा आम्ही प्राणपणाने जपणार आहोत. धनंजय मुंडे यांचे हे भावूक ट्विट सध्या चर्चेत आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त धनंजय मुंडे यांनी त्यांनाही ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या.

धनंजय मुंडे यांचं ट्विट काय?

आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी सकाळीच ट्विट केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला. त्यात त्यांनी लिहिलंय, ‘स्वर्गीय अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे. तो जपुयात, पुढे नेऊयात. विनम्र अभिवादन अप्पा… ‘

अप्पा, तुमचे विचार आजही अवती भोवती

धनंजय मुंडे यांनी कालदेखील एक ट्विट केले. त्यात ते म्हणतात, अप्पा…तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जयंती, पुण्यतिथी असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती असल्याचे जाणवते. ऊसतोड कामगार कल्याणाच्या तुमच्या शब्दाला मी पूर्ण करणार हा शब्द देतो. त्रिवार अभिवादन…

शरद पवार हे एक नाव नव्हे अख्खी कारकीर्द!

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीसोबतच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही वाढदिवस आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पवार यांनाही शुभेच्छा दिल्या. त्यांनी एका ट्टिवटमध्ये लिहिले, पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब म्हणजे केवळ एक नाव नाही, ते एक कारकीर्द, एक मोहीम आणि एक वसा म्हणून लोकसिद्धत्व प्राप्ता झालेले नेतृत्व आहेत. साहेबांना 81 व्या जन्मदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

इतर बातम्या-

Alliance | मुंडे असते तर युती कायम राहिली असती, शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठे विधान; नव्या राजकीय चर्चेला उधाण

Omicron ची धास्ती! औरंगाबादेत दक्षिण अफ्रिकेसह विदेशातून 46 जण आले, 21 जण निगेटिव्ह