Omicron ची धास्ती! औरंगाबादेत दक्षिण अफ्रिकेसह विदेशातून 46 जण आले, 21 जण निगेटिव्ह

Omicron ची धास्ती! औरंगाबादेत दक्षिण अफ्रिकेसह विदेशातून 46 जण आले, 21 जण निगेटिव्ह
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादमध्ये शनिवारी 46 विदेशी नागरिक आले. त्यांचा शोध घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यापैकी 21 जणांची चाणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. विदेशी नागरिकांमध्ये चार दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांचाही समावेश आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Dec 12, 2021 | 10:08 AM

औरंगाबादः महाराष्ट्रात विविध ठिकाणी ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. विविध जिल्ह्याच्या ठिकाणीही खबरदारी घेतली जात आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) शनिवारी विविध देशांतून 46 जण आले. त्यातील चौघे दक्षिण आफ्रिकेतून (South Afrika) तर तिघे सिंगापूर (Singapore) येथून आले आहेत. चारपैकी दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दोघांची 15 डिसेंबरला चाचणी घेतली जाईल. दहा जणांशी अद्याप संपर्क झालेला नाही.

शनिवारी 46 जण आले, चौघे दक्षिण आफ्रिकेचे

शनिवारी दिवसभरात विदेशातून आलेल्या 46 पैकी दोघे ग्रामीण भागातील आहेत. तर उर्वरीत 44 जण शहरातील आहेत. त्यापैकी 4 जण दक्षिण आफ्रिकेतील आले. दोघेजण सिडको एन-4 मधील असून दोघे मुकुंदवाडीतील आहेत. 8 डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावर दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. शहरात येताच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुकुंदवाडीतील दोघांनी प्रवासादरम्यान चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांची पुन्हा 15 डिसेंबर रोजी चाचणी केली जाईल. सिंगापूर येथून आलेल्या तिघांची विमानतळावरील चाचणी निगेटिव्ह आली. मात्र दहा प्रवाश्यांनी अद्याप संपर्क झालेला नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा जोगदंड यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचे 6 रुग्ण, एकाचा मृत्यू

औरंगाबादमध्ये शनिवारी कोरोनाचे सहा रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला. ग्रामीम भागात एकही रुग्ण आढळळला नाही. सध्या 58 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

लसीकरण सक्ती जोरात, बाजारपेठेतही तपासणी

शहरातील बाजारपेठेत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक फिरत असून मास्क न घालणारे, लस न घेणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. अशा नागरिकांवर कारवाई करून दंडही आकारला जात आहे. पेट्रोल पंप, मॉलच्या ठिकाणीही मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. शहरातील मॉल, बाजारपेठा आदी ठिकाणी लसीकरणाचे फिरते केंद्रही ठेवण्यात आले आहे.

मराठवाड्यात दिलासा, 23 रुग्ण

मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी म्हणजे आठही जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात मिळून फक्त 23 रुग्ण वाढले. औऱंगाबाद, बीड आणि धाराशिवमध्ये 10 च्या सरासरीने रुग्णसंख्या वाढत असून, लातूर, परभणी, जालना, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी आहे.

इतर बातम्या-

Railway: बीडचे स्वप्न लवकरच साकारणार, अहमदनगरहून दोन डब्यांची रेल्वे आष्टीपर्यंत धावली, यशस्वी चाचणी!

Aurangabad: शिवसेनेत अंतर्गत गटबाजी, माजी महापौर त्र्यंबक तुपेंवर भ्रष्टाचाराचे आरोप, वाद कोर्टात जाणार?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें