तरीही मी शिक्षा भोगतोय… धनंजय मुंडे यांच्या मनातील खदखद अखेर ओठांवर आलीच; नेमकं काय म्हणाले?

सावरगाव येथील भगवान गड भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण पंकजा मुंडे व धनंजय मुंडे एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच भगवान गडावर हा मेळावा होत आहे

तरीही मी शिक्षा भोगतोय... धनंजय मुंडे यांच्या मनातील खदखद अखेर ओठांवर आलीच; नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 02, 2025 | 1:56 PM

सावरगाव येथील भगवान गड भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सध्या चर्चेत आहे. या मेळाव्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच भगवान गडावर एकत्र आले आहेत. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी भाषण करताना मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी मी आज शिक्षा भोगतोय असे म्हटले आहे. आता धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले? वाचा…

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

दसरा मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी २५० दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला. माझ्या विरोधात घोटाळा काढला. कोर्टात गेले. कोर्टाने मला क्लीनचिट दिली. जे कोर्टात गेले. त्यांना लाख रुपयाचा दंड ठोठावला. एवढं होऊनही मी आज शिक्षा भोगतोय. हे लक्षात घ्या.

वाचा: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम

“आज बीड जिल्ह्यात जातीपातीचं सुरू झालंय”

पुढे ते म्हणाले, या दसऱ्याच्या मेळाव्यात एवढंच सांगतो, आम्ही कुणाला विरोध केला नाही. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. हा अध्यात्म आणि शिक्षणाशी जोडलेला समाज आहे. आपल्या सर्वांना सुरुवात करावी लागेल. आज बीड जिल्ह्यात जातीपातीचं सुरू झालंय, जिगरी दोस्तांची जातीमुळे दोस्ती तुटली. हे वातावरण बदलयाचं आहे. सर्व जातीधर्मातील द्वेष काढायचं आहे.

आरक्षणाविषयी धनंजय मुंडे काय म्हणाले?

आरक्षाविषयी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण दिलं. आम्हाला आनंद आहे. कारण मराठा आंदोलनाच्या चळवळीत आम्ही होतो. पण काही लोकांना आरक्षणाच्या आड राहून ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे. एक उदाहरण सांगतो, ओबीसींचं आता आलेला एमपीएसीचा कट ऑफ होता ४८५ होता. स्पेशल विकरचा कट ऑफ ४५० होता. मला कोणतंच आरक्षण नसेल. मी विकर सेक्शनमध्ये अर्ज भरलं असतं. तर ४५० मार्कात आत गेलो असतो. पण ओबीसीत आल्यावर ४८० मार्क घेऊनही नापस आहे. कुणाला फसवता. काही लोक राजकारण करत आहे. सरकारने आरक्षणासाठी जे करायचं ते केलं आहे. आताही करत आहे. आरक्षण दिलंय. आणखी द्या. काही म्हणणं नाही. पण याच्या ताटातून काढून त्या ताटात देऊ नका.