Ashwini Paul: मागील तीन महिन्यांपासून ती…राष्ट्रीय कुस्तीपट्टू अश्विनी पौळ यांच्या वडिलांनी सांगितली धक्कादायक माहिती
Ashwini Paul Naldurga Fort: राष्ट्रीय कुस्तीपट्टू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं. यानंतर या घटनेला अनेक फाटे फुटले आहेत. आता अश्विनी यांच्या वडिलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Ashwini Paul Naldurg: तुळजापूरमध्ये असलेल्या नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडलेली पाहायला मिळाली. निलंगा तालुक्यातील पौळ अंबुलगा येथील एमएसएफच्या माजी कर्मचारी अश्विनी मनोहर पौळ या राष्ट्रीय महिला कुस्तीपट्टूने आपल्या तीन मुलांसह किल्ल्यातील उपळी बुरुजावरून 100 फुटांवरून उडी मारली. यामध्ये अश्विनी, साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर अडीच वर्षांची मुलगी क्रांती हीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अडीच वर्षाची वीरावर सध्या उपचार सुरु आहे. या घटनेनंतर आता अश्विनीच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर अनेक आरोप केले आहे. तर आता एफआयआरही दाखल केली आहे.
नवरा, सासू आणि सासरे यांच्या जाचाला कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले आहे. सतत फोन करून तिला धमकी द्यायचे, तुला जगू देणार नाही असं ही म्हणायचे. सासरी तिच्यावर खूप प्रेशर होते. आम्ही तिला सतत समजवून सांगत होतो पण सासरची लोक तिला फक्त धमक्या द्यायचे. माहेरी आल्यानंतर देखील फोनवरून तिला सतत टॉर्चर केले जात होते. मागील 8 दिवसात मुलीसोबत काहीतरी घडलं असावं हा संशय देखील वडिलांनी व्यक्त केला आहे. माझी मुलगी तीन महिन्यापासून माझ्याकडेच राहायला होती. आता मी एफआयआर दाखल केली आहे. पोलिस योग्य काय ती कारवाई करतील, असा आरोप अश्विनी पौळ यांनी केला आहे.