AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwini Paul : माहेरी काय राहते, आमच्याकडे कामवाली म्हणून राहा.. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूसोबत सासरी मनाला लागेल असा अपमान

Ashwini Paul : राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह नळदुर्ग किल्ल्याच्या 100 फूट उंच बुरुजावरून उडी मारली. यामध्ये अश्विनी आणि साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचं जागीच निधन झालं आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत त्यांच्या सासरत्या मंडळींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Ashwini Paul : माहेरी काय राहते, आमच्याकडे कामवाली म्हणून राहा.. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूसोबत सासरी मनाला लागेल असा अपमान
Ashwini Paul
| Updated on: Sep 04, 2026 | 4:20 PM
Share

सासरी नांदनाऱ्या मुलींचा छळ होत असेल तर, त्यांना ताबडतोब आई – वडिलांनी घरी आणा… मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा मुलगी आई – वडिलांच्या घरी जिवंत तरी राहिल… असं अनेक जण म्हणतात. पण आता असं काही घडलं आहे, ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. कुणाल चांदगुडे आणि आई – वडिलांच्या निधनाची घटना ताजी असताना राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी देखील किल्ल्यावरुन तीन मुलांसह टोकाचं पाऊल उचललं. समोर येत असलेल्या माहितीनुसार अश्विनी यांचा पती सतत त्यांच्यावर संशय घेत असे. याच संशयामुळे अश्विनी यांना मेहनतीने मिळवलेल्या नोकरीचा देखील त्याग करावा लागला. अखेर सततच्या जाचाला कंटाळून अश्विनी यांनी तीन मुलांसह किल्ल्यावरून उडी मारली आणि सर्वकाही संपवलं…

समोर आलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे वडील तान्हाजी शिवाजी मोहिते यांनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या तक्रारीत सांगितल्यानुसार, आम्ही मुलीचा संसार मोडू नये म्हणून तिला समजावून सांगत होतो…

समोर येत असलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी अश्विनी यांनी नोकरी सोडली होती आणि त्या उमरगा येथे मुलगा अजिंक्य आणि मुलगी विरा यांच्यासोबत माहेरी राहत होत्या. सासरच्या जाचाला कंटाळून अश्विनी आई – वडिलांच्याच घरी राहत होत्या. दरम्यान, अश्विनी यांचा पती मनोहर अंकुश पौळ, सासरे अंकुश पौळ, सासू कालिंदाा पौळ आणि आत्या विमलाबाई… हे सासरचे मंडळी सतत अश्विनी यांना फोन करायचे…

फोन करायचे आणि म्हणायचे, ‘तू माहेरी का राहतेय, तू आमच्या घरी ये आणि याठिकाणी मोलकरणी म्हणून राहा…’, पुढे अश्विनी यांचे वडील म्हणाले, ‘ती आम्हाला सतत म्हणायची, ती आम्हाला वारंवार बोलायची मी माझं आणि माझ्या मुलांच्या जीवाचं बरं वाईट करुन घेईल. त्यावेळी मी माझा मुलगा आणि पत्नी अश्विनीला कायम सांगायचो की असं करु नकोस… तिला आम्ही सतत समजून सांगितलं…’, असं देखील अश्विनी यांचे वडील म्हणाले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अश्विनी या मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये नोकरी करत होत्या. अश्विनी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महिला कुस्तीपटू होत्या. पण पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरुन अश्विनी यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा देखील दिलेला. मागील तीन महिन्यांपासून त्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या.  पोलीस याप्रकरणी सध्या कसून चौकशी  करत आहे.

Follow Us
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल