AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwini Paul : कुस्तीपटूने तीन मुलांसह का घेतला टोकाचा निर्णय? पोलिसांकडून मोठी माहिती समोर

Wrestler Ashwini Paul Death Dharashiv Update : राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. तीन मुलांसोबत त्यांनी नळदुर्ग किल्ल्याच्या 100 फूट उंच बुरुजावरून उडी मारली. याप्रकरणी पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे...

Ashwini Paul : कुस्तीपटूने तीन मुलांसह का घेतला टोकाचा निर्णय? पोलिसांकडून मोठी माहिती समोर
Ashwini Paul
| Updated on: Sep 04, 2026 | 3:11 PM
Share

Wrestler Ashwini Paul Death Dharashiv Update : कुणाल चांदगुडे आणि आई – वडिलांच्या निधनाची घटना ताजी असताना राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी देखील किल्ल्यावरुन तीन मुलांसह टोकाचं पाऊल उचललं. अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह नळदुर्ग किल्ल्याच्या 100 फूट उंच बुरुजावरून उडी मारली. यामध्ये अश्विनी आणि साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचं जागीत निधन झालं आहे. तर जुळ्या मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. यावर पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या माहितीनुसार, महिलेने दोन जुळ्या मुली आणि मुलासोबत दुपारी 1.50 मिनिटांनी प्रवेश केला. अश्विनीय यांनी तीन मुलांसोबत केकचं सेलिब्रिशन केलं. सेलिब्रेशन झाल्यानंतर ते किल्ल्याच्या आत आले. त्यांनी किल्लेदारांना देखील सांगितलं की, माझे मिस्टर अर्ध्या तासात येईल. पण ते नाही आले, त्यानंतर तीन्ही मुलांना घेऊन आत्महत्या केली आहे.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर, महिला आणि मुलगा अजिंक्य फार धक्कादायक अवस्थेत पडलेलं असतं. रुग्णालयात दोघांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्याच्या दोन्ही मुलींना सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं आहे. दोघींची प्रकृती गंभीर आहे. मुलीचे वडील तान्हाजी शिवाजी मोहिते हे शिक्षक आहेत. त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, तक्रारीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं सांगण्यात आलं आहे… याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, अश्विनी या मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये नोकरी करत होत्या. अश्विनी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महिला कुस्तीपटू होत्या. पण पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरुन अश्विनी यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा देखील दिलेला. मागील तीन महिन्यांपासून त्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या. धक्कादायक गोष्ट म्हणजे, माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Follow Us
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला