AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mirzapur X Review: वेब सीरिजपेक्षाही भारी.. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ पाहून भारावले चाहते; कसा आहे रिव्ह्यू?

Mirzapur X Review: 'मिर्झापूर' या वेब सीरिजवर आधारित चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला, ते जाणून घ्या..

Mirzapur X Review: वेब सीरिजपेक्षाही भारी.. 'मिर्झापूर: द मूव्ही' पाहून भारावले चाहते; कसा आहे रिव्ह्यू?
मिर्झापूर- द मूव्हीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2026 | 3:11 PM
Share

Mirzapur X Review: बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ अखेर आज (4 सप्टेंबर, 2026) चित्रपटगृहात दाखल झाला असून, पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी आणि रवी किशन यांसारखे कलाकार पुन्हा एकदा ‘मिर्झापूर’च्या विश्वात परतले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या असून, अनेकांनी याला वेब सीरिजपेक्षाही दमदार म्हटलं आहे.

‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी सर्वात मोठं आकर्षण ठरलं आहे ते म्हणजे दिव्येंदू शर्माचा मुन्ना त्रिपाठी. चित्रपटातील त्याच्या स्क्रीन प्रेझेन्स, अंदाज, कॉमिक टायमिंग आणि आक्रमक भूमिकेचं सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. काही प्रेक्षकांनी तर मुन्ना भैयाच्या एण्ट्रीपासूनच थिएटरमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. एका प्रेक्षकाने चित्रपटाला 4.5 स्टार देताना कथा, स्क्रीनप्ले, राजकारण, बदला, अॅक्शन, संवाद आणि बॅकग्राउंड म्युझिक या सर्वच गोष्टी वेब सीरिजपेक्षा मोठ्या आणि अधिक प्रभावी वाटल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुन्ना भैयाची व्यक्तिरेखा पुन्हा पाहण्याची चाहत्यांची इच्छा काही प्रमाणात पूर्ण झाल्याचं दिसत आहे.

पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा कालीन भैयाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या शांत पण धोकादायक व्यक्तिमत्त्वाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्यांची स्क्रीन प्रेझेन्स आणि अभिनय चित्रपटातील महत्त्वाच्या आकर्षणांपैकी एक असल्याचं सुरुवातीच्या प्रतिक्रियांमधून दिसत आहे. दुसरीकडे, रवी किशनच्या बब्बुआ यादव या व्यक्तिरेखेचीही जोरदार चर्चा होत आहे. त्याचा अंदाज, धोकादायक व्यक्तिमत्त्व आणि अभिनय प्रेक्षकांना आवडल्याचं सोशल मीडिया प्रतिक्रियांमध्ये दिसून येतं. काही समीक्षकांनी पंकज त्रिपाठी, दिव्येंदू आणि रवी किशन यांच्या कामाला विशेष दाद दिली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘मिर्झापूर’ म्हटलं की हिंसक अॅक्शन, दमदार संवाद आणि थरारक राजकारण हे समीकरण ठरलेलं आहे. चित्रपटानेही या फ्रँचायझीची हीच ओळख मोठ्या पडद्यावर कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीच्या प्रतिक्रियांनुसार अॅक्शन सीक्वेन्स अधिक मोठ्या प्रमाणात सादर करण्यात आले आहेत, तर बॅकग्राउंड स्कोअरने अनेक महत्त्वाच्या प्रसंगांचा प्रभाव वाढवल्याचं म्हटलं जात आहे.

चित्रपटातील डायलॉगही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेक प्रेक्षकांना ‘मिर्झापूर’च्या जगाला साजेसा आक्रमक अंदाज पुन्हा अनुभवायला मिळाल्याचं वाटत आहे. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटाचं कौतुक केलं असलं तरी काहींनी त्याच्या वेगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः दुसऱ्या भागात कथा काहीशी संथ होते आणि काही प्रसंगांमध्ये गरजेपेक्षा जास्त स्पष्टीकरण दिलं जातं, अशी प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी दिली आहे. काहींना चित्रपट वेब सीरिजच्या तुलनेत कमी आक्रमक आणि प्रभावी वाटल्याचंही म्हटलं आहे.

एकंदर सुरुवातीच्या प्रतिक्रिया पाहता ‘मिर्झापूर: द मूव्ही’ने चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साह निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. विशेषतः मुन्ना भैयाची वापसी, कालीन भैयाचा दरारा, रवी किशनचा अंदाज आणि दमदार अॅक्शन यामुळे हा चित्रपट ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी मोठा थिएटर अनुभव ठरण्याची शक्यता आहे.

Follow Us
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला