AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्मचाऱ्यांना लॉटरी! महिन्याला घसघशीत पगारवाढ, वार्षिक बोनसही 50000 मिळणार; नेमका कसा करार झाला? रविंद्र चव्हाणांची महत्त्वाची भूमिका

NCPA मधील सर्व कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली. त्यांच्या महिन्याला पगारात घसघशीत वाढ झाली. त्यांना वार्षिक बोनसही 50000 मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांना लॉटरी! महिन्याला घसघशीत पगारवाढ, वार्षिक बोनसही 50000 मिळणार; नेमका कसा करार झाला? रविंद्र चव्हाणांची महत्त्वाची भूमिका
ravindra chavan news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 3:04 PM
Share

भाजप-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) सोबत कामगारांच्या हितासाठी वेतनवाढ करार यशस्वीपणे संपन्न केलाय. त्यांनी हा करार भाजप प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात झाला. या वेतनवाढ कराराची अंमलबजावणी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2028 या कालावधीसाठी झाली. याचा अर्थ 4 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलीये. आता या करारानुसार NCPA मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 7250 रुपयांची वाढ दिली. यासहित कर्मचाऱ्यांना वर्षाला 50000 बोनस मिळणार आहे, अशी माहिती रविंद्र चव्हाणांनी दिली.

रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले, हा करार NCPA व्यवस्थापन आणि कामगार संघटनेदरम्यान झालेला तिसरा वेतनवाढ करार झाला आहे. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने संघटनात्मक कामगिरीच्या कामगारांच्या वेतनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. याआधी NCPA मध्ये मुंबई लेबर युनियन ही बहुसंख्य कामगारांची संघटना होती. आता अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघानं संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम करत आहे. मुंबई लेबर युनियचे संपूर्ण सदस्यत्व अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघामध्ये आणले आहेत. त्यानंतर औद्योगिक न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेतून अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ ही NCPA मधील सर्वात मोठी संघटना आहे’.

या ऐतिहासिक वेतनवाढ कराराच्या स्वाक्षरी समारंभास NCPA च्या वतीने अध्यक्ष संटूक, संचालक फ्रेडी तलाठी, तांत्रिक संचालक काळे, मानव संसाधन विभागाचे व्हिन्सेंट डिसूझा यांनी हजेरी लावली. तर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाकडून सुहास माटे, प्रशांत वर्तक उपस्थित होते. यासहित संघटनेचे प्रमुख पदाधिकारी होते.

करारानंतर रविंद्र चव्हाण काय म्हणाले?

रविंद्र चव्हाण म्हणाले, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. हे यश एकजूट, संघटनात्मक ताकद, कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे. आता NCPA मधील कामगारांना मिळालेली ही वेतनवाढ भविष्यातील चांगल्या सेवा-सुविधा आणि कामगार कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे’.

Follow Us
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत