AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arhaan Debut Film : पुतण्याच्या डेब्यूसाठी सलमानची कंबर कसून तयारी, अरहानच्या फिल्ममध्ये भाईजानचा कॅमिओ ?

Arhaan Debut Film : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याच्या हातात सध्या बरेच मोठे चित्रपट आहेत. पण सर्वात जास्त चर्चा होत्ये ती त्याच्या पुतण्याच्या डेब्यू फिल्मची. त्यात सलमानही झळकणार का ? याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Arhaan Debut Film : पुतण्याच्या डेब्यूसाठी सलमानची कंबर कसून तयारी, अरहानच्या फिल्ममध्ये भाईजानचा कॅमिओ ?
सलमान खानचा कॅमिओ ?
| Updated on: Sep 04, 2026 | 2:44 PM
Share

Arhaan Debut Film : बॉलीवूडचा सुपरस्टार, दबंग स्टार अर्थात सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि कुटुंबियांमुळेही चर्चेत असतो. एकीकडे त्याच्या अपकमिग प्रोजेक्टची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे तो आता पुतण्याच्या चित्रपटासाठी देखील सज्ज झाला आहे. सलमानचा पुतण्या, अरबाज खान आणि मलायका अरोर यांचा मुलगा अरहान खान हा लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. एका अॅक्शन -रोमँटिक पिक्चरमधून तो करिअरची सुरूवात करणार आहे. अरबाजचा मुलगा अरहान हा सलमानच्या खूप जवळ आहे. सलमान खान हाही त्याच्या कुटुंबाबद्दल आणि घरातल्या मुलांबद्दल , त्यांच्या करिअरबद्दल सतर्क असत. तो संपूर्णपणे त्यांची साथ देतो आणि अरहानसाठी देखील त्याचं असंच प्लानिंग आहे. नव्या अपडेटनुसार, अरहानच्या डेब्यू फिल्ममध्ये सलमान खानही दिसणार आहे.

सलमानचाही कॅमिओ ?

अलीकडेच बॉलिवूड हंगामावर एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला. त्यातून अशी माहिती समोर आली की, अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खानच्या डेब्यू चित्रपटात सलमान खानचाही कॅमिओ असणार आहे. सध्या या चित्रपटाची कथा गुप्त ठेवण्यात आली आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान या कथेत छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. आपल्या स्टार पॉवरच्या जोरावर तो आपल्या पुतण्याच्या पहिल्या चित्रपटाला अधिक प्रसिद्धी मिळवून देण्यास मदत करताना दिसणार आहे. एवढंच नव्हे तर सध्या अशीही चर्चा सुरू आहे की, सलमान खान आपल्या या कॅमिओसाठी 10 दिवस शूटिंग करू शकतो.

पुतण्याच्या डेब्यूमध्ये झळकणार सलमान खान

अभिनेता सलमान खान आपल्या पुतण्याच्या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार ते मात्र अजूनही समोर आलेलं नाहीये. दरम्यान, अरहानच्या चित्रपटासाठी त्याचे कुटुंबीय नक्कीच उत्सुक असतील. मात्र, सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणं ही तर कोणत्याही अभिनेत्यासाठी मोठी गोष्ट असते. त्यामुळे अरहानला देखील ही मोठी संधी मिळणार आहे.

अरहानच्या या डेब्यू फिल्मचं नाव याअजूनही निश्चित झालेलं नाही. मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध अय्यर करणार आहेत. त्यांनी यापूर्वी आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत अभिनीत ‘एन अॅक्शन हिरो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. या प्रोजेक्टची निर्मिती अश्विन वर्दे करणार आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या निर्मितीतील प्रोजेक्ट्समध्ये ‘कबीर सिंह’, ‘ओएमजी 2’, ‘खेल खेल में’ आणि ‘द डिप्लोमॅट’ यांचा समावेश आहे.

अरहान गेल्या काही वर्षांपासून आपल्या फिल्म डेब्यूची तयारी करतोय. त्याने अमेरिकेत फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतल्यानंतर विक्रम फडणीस यांच्यासोबत काम केलं. तसेच, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी त्याने करण जोहरला असिस्ट केलं होतं.

Follow Us
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत