शरद पवार यांच्या भाषणादरम्यान वादळ सुटले, बॅनर पडले, पवारांनी भाषण आवरत…

Sharad pawar rally: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून शरद पवार यांनी धुळे लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासाठी गुरुवारी सभा घेतली. सटाण्यात सुरु असलेल्या सभेच्या वेळी वादळ सुटले.

शरद पवार यांच्या भाषणादरम्यान वादळ सुटले, बॅनर पडले, पवारांनी भाषण आवरत...
शरद पवार यांचे भाषण सुरु असताना वादळ आले
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 2:32 PM

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा पाचवा टप्पा सुरु आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. प्रचारासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा आणि रोड शो घेतले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून शरद पवार यांनी धुळे लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासाठी गुरुवारी सभा घेतली. सटाण्यात सुरु असलेल्या सभेच्या वेळी वादळ सुटले. त्यावेळी शरद पवार यांचे भाषण सुरू होते. या वादळामुळे व्यासपीठावर मागील बाजूला असलेले बॅनर पडले. यामुळे परिस्थिती पाहून शरद पवार यांनी आपले भाषण थोडक्यात आवरते घेतले.

काय म्हणाले शरद पवार

सटाण्यातील सभेत बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही. आम्ही सत्तेवर असताना माझ्या विरोधात भाजपावाल्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून घोषणा दिल्या होत्या. परंतु आता सरकार असताना भाव देत नाही. यंदा कांद्याचे उत्पादन चांगले आले. यामुळे कांदा उत्पादक जिराईत शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत होते. परंतु सरकारने निर्यात बंदी केली. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे.

कांदा, द्राक्षाला भाव नाही

मी सरकारमध्ये असताना माझे सभा मनमाड झाला होती. सभेदरम्यान कांद्याच्या भावासंदर्भात विषय निघाला. त्यानंतर मी सरळ दिल्लीला जाऊन सरकारच्या लोकांशी बोलल होतो. परंतु आजच्या सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता नाही. काल नाशिकला पंतप्रधान आले होते. परंतु कांदा उत्पादक आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांना दिसल्या नाही. आमचे सरकार असताना द्राक्ष उत्पादकांना चांगला भाव मिळत होता. आता द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे.

हे सुद्धा वाचा

द्राक्ष, कांदा सर्वच पिकांचे भाव खाली आले आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान नाशिकमध्ये येऊन आम्ही चांगला भाव दिला असे वक्तव्य करत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Non Stop LIVE Update
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.