Dhule crime : वाहनातून घेऊन जात होते तब्बल 90 तलवारी! धुळ्याच्या सोनगीर पोलिसांनी चार जणांना केली अटक

गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता तब्बल 90 तलवारी (Swords) आढळून आल्या. याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी तत्काळ चारही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या कारवाईत सोनगीर पोलिसांनी 7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Dhule crime : वाहनातून घेऊन जात होते तब्बल 90 तलवारी! धुळ्याच्या सोनगीर पोलिसांनी चार जणांना केली अटक
सोनगीर पोलिसांकडून 90 तलवारी जप्त तर चार आरोपी ताब्यात
| Updated on: Apr 28, 2022 | 12:31 PM

धुळे : शिरपूरमध्ये (Shirpur) पोलिसांनी तलवारी जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच 09 सीएम 0015ला सोनगीर पोलिसांनी (Songir Police) थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून सदर गाडी थांबवून विचारणा केली. त्यांनतर गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता तब्बल 90 तलवारी (Swords) आढळून आल्या. याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी तत्काळ चारही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तर तलवारीही जप्त केल्या आहेत. आरोपी हे चित्तोडगड येथून 90 तलवारी जालना येथे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे.

7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

याप्रकरणी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी यासंबंधीची माहिती दिली. या कारवाईत सोनगीर पोलिसांनी 7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील अधिक तपास सोनगीर पोलीस करीत आहे. ही कारवाई सोनगीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह पथक तसेच पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व विभागीय पोलीस उपअधीक्षक प्रदीप माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

आणखी वाचा :

Pune crime : बेकायदा ताडी विक्री अन् सेवन; आंबेगावातील शिनोलीतल्या अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना पोलिसांनी केली अटक

Ganesh Naik : जेल की बेल? गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय; बलात्कारप्रकणी अटकेची टांगती तलवार कायम

Pune Child marriage : बालविवाह पडला महागात; पतीसह मुलीच्या वडिलांवर पुण्यातील चाकण पोलिसांत गुन्हा दाखल