‘संगीत संन्यस्त खडग’ नाटकाला वंचितचा विरोध, पोलिसांच्या बंदोबस्तात खेळ पार पडला

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे आज स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडक या नाटकाचा प्रयोग पोलिस बंदोबस्तात पार पडला. या नाटकात भगवान गौतम बुद्धांबद्दल आक्षेपार्ह विधाने असल्याने वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे.

संगीत संन्यस्त खडग नाटकाला वंचितचा विरोध, पोलिसांच्या बंदोबस्तात खेळ पार पडला
| Updated on: Nov 04, 2025 | 9:07 PM

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खडग’ नाटकाला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे काही संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे. या नाटकात गौतम बुद्धांची बदनामी केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने करत या नाटकाचा खेळ बंद करावा अशी मागणी करत निदर्शने केली.परंतू पोलिस बंदोबस्तात या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सुरळीत पार पडल्याचे म्हटले जात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘संगीत संन्यस्त खडग’ या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. या नाटकाला याआधी पुण्यातही काही संघटनांनी विरोध केला होता. या नाटकात भगवान गौतम बुद्धांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. दरम्यान, या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सुरु असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत खेळ चालू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतू नंतर पोलिस बंदोबस्ता या नाटकाचा खेळ सुरळीत झाल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, या नाटकाबद्दल भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की हे संगीत संन्यस्त खडग हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1931 मध्ये हे लिहिल होते. ठाण्यातील गडकरी रंग येताना या ठिकाणी आज त्याचा प्रयोग होता. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाटकाचा प्रयोग होऊन देणार नाही अशा प्रकारचा आंदोलन केलं
मात्र या नाटकामध्ये कुठेही आक्षेपार्ह विधान वा गौतम बुद्धांबाबत काहीही नाही असे भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी म्हटले आहे.अभिव्यक्ती स्वतंत्र असल्याने कोणीही उठतो आणि आंदोलन करतो. ज्या लोकांना वाटतं की यामध्ये आक्षेपार्ह किवा बदनामी कारक विधाने केली गेली आहेत. त्यांनी स्वतः हे नाटक पाहावे. महात्मा गांधी यांचे विचार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे वेगवेगळे होते असेही लेले यांनी सांगितले.

पोलिसांच्या बंदोबस्तात खेळ

या नाटकाला ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील आणि वंचित आघाडीकडून कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर लिखित नाटक संगीत संन्यस्त खडग नाटकाच्या खेळावरून ठाणे येथील गडकरी रंगायतन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांच्या बंदोबस्तात या नाटकाचा प्रयोग संपला.
या नाटकाच्या मध्यांतर नंतर दुसऱ्या भागात आक्षेपार्ह विधाने असल्यामुळे वंचित आघाडी आक्रमक झाली आहे. नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.