मोठी बातमी! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; दिशा सालियनच्या वडिलांची कोर्टात धाव

मोठी बातमी समोर येत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मोठी बातमी! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; दिशा सालियनच्या वडिलांची कोर्टात धाव
aaditya thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 19, 2025 | 10:32 PM

मोठी बातमी समोर येत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यसह मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी जेव्हा दिशा सालियनच्या वडिलांशी संवाद साधण्यात आला होता, तेव्हा अशी कुठलीही शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती. आता मात्र त्यांनी या प्रकरणात याचिका दाखल करत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यसह मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल व्हावा, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, आणि हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशा पद्धतीची मागणी या प्रकरणात करण्यात आली आहे.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. दिशाचा सामूहिक बालात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे, या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे.

दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मॅनेज केलं. दिशाप्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली. त्यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल केला जावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, असं याचिकेत म्हटलं आहे.

मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप  दिशाच्या वडिलांनी केला आहे.  नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोपही  दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा देखील याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us