आमदार श्वेता महाले यांनी संजय गायकवाड यांना डिवचलं, वाद वाढला, व्हिडीओ शेअर करत..
भाजपा आमदार श्वेता महाले आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद काही कमी होताना दिसत नाही. दोघांमधील वाद वाढत आहे. त्यातच आता पुन्हा संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांनी डिवचले आहे. ज्यातून पुन्हा वाद निर्माण होऊ शकतो.

आमदार संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. बाप तो बाप रहेगा, विषय वाढताना दिसत आहे. एक महिलेने आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलिसात धाव घेतली. आमदार महाले बाप तो बाप रहेगा, या गाण्यावर थिरकल्या, प्रश्न विचारला होता. यावर आमदार गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोललेले बरं. पण एखाद्या बाईने म्हटले की बाप आहे… तर बाई बापासारखे शरीर कुठून आणणार आहे. गायकवाड आणि महाले यांच्यातील वाद कमी व्हायचा तर हा वाद वाढताना दिसत आहे. त्यातच आता पुन्हा आमदार श्वेता महाले यांनी संजय गायकवाड यांना डिवचल्याचे बघायला मिळाले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी पुन्हा टीका केली. महाले आणि गायकवाड यांच्या वादात आता वरिष्ठ नक्की काय भूमिका घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
दोन्ही नेते महायुतीतील आहेत. मात्र, दोघांमध्ये वाद पेटला आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी पुन्हा आमदार संजय गायकवाड यांना डिचवलं. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड करत चिमटा घेतला आहे. बाप तो बाप रहेगा यावरून पुन्हा आमदार महाले चर्चेत आल्यात. व्हिडीओ अपलोड करून पुन्हा बुलडाणा मतदार संघ भाजपच्या टार्गेटवर.
लगाओ जोर अपने तालूकात का जरा हम भी तो जाणे तुम्हारा कोण बाप हमे नहीं जनता… बुलढाणा जिल्ह्यातील भाजप शिवसेना वाद मिटता मिटेना… इंस्टाग्रामच्या व्हिडीओनंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे. श्वेता महाले यांच्या या व्हिडीओवर संजय गायकवाड प्रतिक्रिया देणार.
आमदार संजय गायकवाड यांनी थेट म्हटले होते की, बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोललेले बरं. पण एखाद्या बाईने म्हटले की बाप आहे… बाई बापासारखे शरीर कुठून आणणार? यावरूनच त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. महिलांच्या मनास लज्जा वाटेल असे हातवारे आमदार संजय गायकवाड यांनी केल्याचे म्हणत त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
