शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील वाद पेटला, भरत गोगावले यांचे ओपन चॅलेंज, थेट म्हणाले, मी…

राज्यात महायुतीचे सरकार असून काही जिल्ह्यांमध्ये असूनही पक्षांमध्ये वाद असल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच भरत गोगावले यांनी थेट ओपन चॅलेंज देऊन टाकले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद चव्हाट्यावर आली आहेत.

शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील वाद पेटला, भरत गोगावले यांचे ओपन चॅलेंज, थेट म्हणाले, मी...
Bharat Gogawale
| Updated on: Nov 21, 2025 | 7:57 AM

मंत्री भरत गोगावले यांनी मोठे विधान करत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. फक्त निशाणाच नाही तर आम्ही आव्हान स्वीकारले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतच टांगा पलटी झाला असता असेही म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. भरत गोगावले म्हणाले की, मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधन आहेत पण एक ना एक दिवस दिवस जय महाराष्ट्र करणार.. मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे इथे धावीर महाराज आहेत, आमच्याकडे तिकडे वीरेश्वर महाराज आहेत. दोन्ही एकच देव आहेत. दोन्ही पिंडीवरचे फुल उचलायचे भरत शेठनी जर काही चुकीचे काम केले असेल त्याचे प्रायचित्त भरत शेठ भोगेल लोकसभेला जर आमदारकीला काही चुकीचे काम केले असेल आमच्याबद्दल तिघांबद्दल तर त्यांनी उचलायचे ते भोगतील.

जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत गोगावले कधी झुकत नाही हा आमचा बाणा आहे. काय हेसियत होती तुमची अख्ख्या महाराष्ट्रमधून तुमची एक सीट आम्ही निवडून दिली. सगळ्या महाराष्ट्रमध्ये सुपडा साफ झाला होता. इथे फक्त आमच्या महेंद्रनी,रवी शेठ नी, मी आणि योगेशनी थोडी फक्त वाकडी मान केली असती तर याचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते. एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामात मदत केली तर आपण त्याची आयुष्यभर जाणीव ठेवतो.

वा रे वा आम्हाला आवाहन करताय… स्वीकारला आव्हान आम्ही स्वीकारलं… लोकसभेच्या वेळेला 39 हजाराचा लीड आमच्या आमदारकीला लीड कमी झाली. आम्ही पण लीड दिल्या मतदाराची टक्केवारी बघा ही मते कोणाची होती आणि तुम्ही सांगताय लोकसभेला काय केलं. धावीर महाराज जर नाय कोपला या संध्याकाळच्या वेळेला तर मला विचारा इथेच करा आणि इथेच भरा लांब जाण्याची आवश्यकता नाही.

जोपर्यंत आमची नीतिमत्ता नियत चांगले आहे तोपर्यंत आम्हाला हे कोण हरवू शकत नाही. आम्ही पक्षप्रवेश करून घेतला आणि आम्ही त्यांना वापरले आणि फेकले अशी आमची नीतिमत्ता नाही आहे. आम्ही गूळ खोबरे देत नाही तर माणुसकी देतो. तिकडे अलिबाग, महाड, कर्जत तिघांच्यामध्ये तुम्ही आहात काळजी नाही करायची तीन तिकडे काम बिगडा होऊन देणार नाही. पोलीस, तहसीलदार सर्वांना सांगून टाकलेला आहे दुजाभाव चालणार नाही.

आमचा कार्यकर्ता चुकला तर आम्हाला सांगा हरकत नाही. चुकणार असतील तर त्यांना त्रास झाला तर त्याची गय केली जाणार नाही. जाणून-बुजून कोणी पाय लावण्याचा प्रयत्न केला तो जर अंगावर आल तर त्याला शिंगावर घ्यायचा आहे ही शिवसेनेची ताकद आहे. आज मुंबईमध्ये मराठी माणूस जो पाय रोऊन उभा आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाशीर्वादामुळे शिवसेनेमुळे हे कोणालाही नाकारता येत नाही.

सगळ्या गोष्टी पैशांमध्ये जोखल्या जात नाहीत काही तत्वाने पण चालावं लागतं. रोहा बदलतो आहे आणि रोहा बरोबरच आजूबाजूची गावही बदलतात. एक ना एक दिवस अखंड रोहा तालुकाच बदलल्याशिवाय राहणार नाही, असेही भरत गोगावले यांनी म्हटले. भरत गोगावल यांनी थेट टीका सुनील तटकरे यांच्यावर केली आहे.