संपूर्ण MPSC मंडळच बरखास्त करा, सत्तेतील आमदाराचा सरकारला घरचा आहेर, मुख्यमंत्र्यांना पत्रही देणार

सध्या एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये घोळ सुरू आहे. यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आता सत्ताधारी आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर देण्यात आला आहे.

संपूर्ण MPSC मंडळच बरखास्त करा, सत्तेतील आमदाराचा सरकारला घरचा आहेर, मुख्यमंत्र्यांना पत्रही देणार
sanjay gaikwad
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 5:44 PM

सध्या एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये घोळ सुरू आहे. यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आज याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे परीक्षेमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून सत्ताधारी आमदारानेच सरकारला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या संदर्भात काही गंभीर आरोप केले असून, संपूर्ण एमपीएससी मंडळच बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?

Loading...

राज्यभरातून MPSC च्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे,  पेपर तपासणीत घोळ होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील तीन नाव माझ्याकडे आहेत. 2018 पासून खूप  घोळ झाला आहे. या लोकांकडे इतकी प्रोपर्टी कशी वाढली?  या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. आता फॉरेंसीकच्या भरती परीक्षेमध्ये देखील घोळ झाला आहे.  हे संपूर्ण मंडळच बरखास्त केलं पाहिजे. माझ्याकडचे पत्र आणि पुरावे मी सीएमकडे पाठवणार आहे. यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी यावेळी संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

दरम्यान दुसरीकडे किती लोकांना पैसे घेऊन पास केले? ते तपासलं पाहिजे. बुद्धीमान लोकांना  पैसे देण्याची गरज पडत नाही, मर्जीतल्या लोकांना पेपर दिले जात आहेत.  खरे लोकं खरे मुलं पास होत नाहीत. आयोगाच्या कमिटीवर जे आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. काळ कोणताही असो, कोणाच्या काळातही घोटाळे झालेले असोत, त्याची चौकशी झाली पाहिजे.  देवांनंद शिंदे,  शैलेंद्र देवळाणकर, सतिश देशपांडे आणि अभय वाघ यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान संजय गायकवाड यांच्या मागणीमुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता एमपीएससीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us