Rain Updates : पुन्हा संकट… शेतकऱ्यांच्या पोटात गोळा, जाता जाता पाऊस पुन्हा झोडपणार, हवामान खात्याचा इशारा काय?

Maharashtra Weather Update : गेल्या अनेक महिन्यांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर आता तरी कमी होणार का ? दिवाळी कोरडी जाणार की तेव्हाही छत्र्या वापराव्याच लागणार ? कसंअसेल राज्यातलं वातावरण, आता पावसाबद्दल इशारा काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती..

Rain Updates : पुन्हा संकट… शेतकऱ्यांच्या पोटात गोळा, जाता जाता पाऊस पुन्हा झोडपणार, हवामान खात्याचा इशारा काय?
rain updates
| Updated on: Oct 14, 2025 | 9:46 AM

दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला असून घरोघरी सणाची लगबग सुरू झाली आहे. साफसफाई, खरेदी आटपून आता बहुतांश घरांत फराळांचे सुवास दरवळू लागले आहेत. दिवाळीच्या आसपास थंडीची देखील चाहूल लागते. पण यंदा मात्र थंडीऐवजी पावसाच्याच सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मे महिन्यापासून कोसळमार पाऊस अदयापही विश्रांती घेण्याचा मूडमध्ये दिसत नसून दिवाळीच्या दिवसातंही धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गणपती, नवरात्रौत्सनव, दसरा सगळ्या सणांना हजेरी लावणारा पाऊस दिवाळीतही पाठ सोडणार नसल्याचे बोलले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 15 ते 20 ऑक्टोबर या काळातही महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत फटाक्यांच्या आवाजासह ढगांचा गडगडाट,वीजांचा कडकडाचही ऐकू येऊ शकतो.

हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरणार असल्याचा इशारा दिला आहे. तर काही जिल्ह्यात मात्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 ते 18 ऑक्टोबर (17 ऑक्टोबर – वसुबारस, 18 ऑक्टोबर – धनत्रयोदशी, 20 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी) यादरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदा बहुताश लोकांची दिवाळीदेखील पावसातच जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला असून शेतकऱ्यांची चिंताही अद्याप कमी झालेली नाही.

मान्सूनची परती कधी ?

मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनने सोमवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झापखंड, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा ओलांडला आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मान्सूनने परतीची वाट धरली आहे. मात्र असे असले तरीही पूर्व विदर्भातील केवळ गडचिरोलीच्या काही भागामध्ये मान्सून कायम असून येत्या 2-3 दिवसांत तो परत फिरेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मान्सून परतला, तरी राज्यात दिवाळीच्या आगमनाच्या वेळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी शक्यता आहे. तसेच मुंबईतही 16 व 17 ऑक्टोबर रोजी पावसाच्या सरी कोसळू शकतात. याच पार्श्वभूमीवर अलर्ट देण्यात आला आहे.